Anchor : घरातून कुणालाही न सांगता पैसे घेतले या पैशांतून महागडा मोबाईल घेतला .वडिलांना याबाबत समजताच त्यांनी विचारणा केली .त्यामुळे घाबरलेल्या मुलाने थेट आत्महत्येचे पाऊल उचलल्याची घटना कल्याण मध्ये घडली . कल्याण मधील पत्री पूल परिसरात एका झाडाला लटकलेला अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.या तरुणाने आत्महत्या का केली या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांचा तपास सुरू झाला व या तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
व्हीओ : कल्याण मधील पत्रिपुल परिसरात काल रत्रियाच्या सुमारास रेल्वे रुळाशेजारी एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणाच्या तपास सुरू केला. मुलाचे नाव राजवर्धन यादव असून तो सतरा वर्षाचा होता.तो व त्याचे कुटुंब उत्तर प्रदेश येथील गाजीपुर ला राहतात . राजवर्धन नुकताच बारावी पास झाला होता. त्याला महागडा मोबाईल घ्यायचा होता म्हणून त्याने कुणालाही न सांगता घरातून पैसे घेतले आणि त्यानंतर उत्तर प्रदेश हून मिरा भाईंदर येथे आपल्या काकाच्या घरी आला आणि त्यानंतर त्या पैशातून आय फोन घेतला . त्याच्या वडिलांना जेव्हा घरातून पैसे गायब असल्याचे माहित पडले.. तेव्हा त्यांनी याबाबत राजवर्धनला विचारणा केली.. राजवर्धन घरात कोणालाही न सांगता पैसे आणले होते व मोबाईल घेतला त्यामुळे राजवर्धन घाबरला व भीतीपोटी त्याने काल रात्रीच्या सुमारास पत्रिपुल परिसरात रेल्वे रुळा लगत असलेल्या झाडाला फाशी घेत आत्महत्या केली..