कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकग्राम पादचारी पूलाचे भूमीपूजन झाले. कार्यक्रमानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार टिका केली आहे. चमकेश सत्ताधाऱ्यांनो विनंती आहे की, पाहिजे तर दर आठवड्याला प्रत्येक खांबाचे भूमीपूजन करा पण हा पूल लवकरात लवकर लोकांच्या सोयीसाठी तयार होईल ते पहा. तुम्हाला पुढील भूमीपूजनासाठी मनसे शुभेच्छा मनसे आमदारांचा आरोप आहे की, गेली अनेक वर्षे रखडलेले लोकग्राम पादचारी पूलाचे आज पुन्हा एकदा भूमीपूजन झाले. खरे तर जानेवारीत हे काम सुरु झाले. पण काम मंद गतीने सूरू आहे.
कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पूलाचे भूमीपूजन
-कल्याणमधील लोकग्राम पादचारी पूलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण करणार असून हा पादचारी पूल नागरीकांसाठी खुला केला जाईल अशी ग्वाही कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
लोकग्राम पादचारी पूलाच्या कामाचे भूमीपूजन खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड, आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी महापौर विनीता राणे, मल्लेश शेट्टी, दीपेश म्हात्रे, महेश गायकवाड, निलेश शिंदे, प्रशांत काळे, विशाल पावशे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी खासदार शिंदे यांनी सांगितले की, लोकग्राम पादचारी पूल अरुंद होता. त्याला पाडून नव्याने तयार करण्यात येणार आहे. या पूलासाठी लागणारा ७८ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दिला असून पहिल्या टप्प्यातील ४२ कोटी ५० लाखाच्या निधीतून सिव्हील वर्क सुरु करण्यात आले आहे. उर्वरीत निधीतून अन्य काम केले जाणार आहे.
या पादचारी पूलामुळे कल्याण पूर्व भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुलाच्या भूमिपूजन नंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना खासदार यांच्यावर सडेतोड टीका केली आहे