आणि पोलिस तपासात काय उघड झाले….
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने फेक फेसबूक अकाऊंट तयार केले. त्या आकाऊंटच्या माध्यमातून अनेक महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आली. अखेर या प्रकरणात कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी फेक आकाऊंट तयार करणाऱा तरुण चंदन सुभाष शिर्सेकर या २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. चंदन हा ओला गाडी चालक आहे. त्याने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरुन केला आहे. याचा तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहेत. मात्र या प्रकरणात बदनामी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार झाला आहे याच्यामागे खरं सूत्रधाराला कोण आहे त्याला पोलिसांकडून लवकरच अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.
काही दिवसापूर्वी कल्याण पूर्व विधानसभेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्यांच्या आवाजा ऐवजी कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकण्यात आला होता. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना काही दिवसापूर्वी भाजप आमदारांना माहिती पडले की, त्यांच्या नावाने फेसबूकवर फेक आकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जात आहे. त्यामध्ये हॅलो. हाय, गुड गुड मॉर्निंग सारखे मेसेस पाठविले तर जात होते. परंतु त्यामध्ये तुम्ही भेटू शकता का असा मेसेजही पाठविला जात होता. त्यापैकी काही महिलांनी थेट आमदार गायकवाड यांना विचारणा केली की, साहेब तूम्ही मला फेसबूकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आहे. हे ऐकून गायकवाड यांनी धक्काच बसला. त्यांनी कोणालाही फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली नसताना ही विचारणा कशी काय झाली. याची दखल घेत त्यांच्या लक्षात आले की, काेणी तरी त्यांचे फेसबूकवर फेक आकाऊंट काढले आहे. त्याची तक्रार त्यांनी थेट पाेलिस आयुक्तांकडे केली. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी उल्हास जाधव यांनी तपास सुरु केला. या प्रकरणात चंदन सुभाष शिर्सेकर या २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. चंदन हा कोळसेवाडी परिसरात राहणारा आहे. तो ओला गाडी चालक आहे. चंदन फक्त दहावी शिकला आहे. विशेष म्हणजे तो पकडला जाऊ नये यासाठी दुसऱ्यांचे वायफाय आणि हॉटस्पॉट वापर करीत होता. रविवारी दुपारी चंदनला कल्याण न्यायालयात हजर केले आहे. चंदनने हा प्रकार का केला. कोणाच्या सांगण्यावरुन केला आहे का? असे मेसेज पाठवून काही आर्थिक फायदा केला आहे का या विविध प्रश्नाचा शोध पोलिस घेत आहेत.
या प्रकरणी आमदार गायकवाड यांनी सांगितले की, चंदन हा शिकलेला नाही. त्याने कोणाच्या सांगण्यावरुन हा प्रकार केला आहे. त्यामागे माझी बदनामी करण्याचा उद्देश आहे. पोलिसानी लवकरात लवकर सखोल चौकशी करुन सूत्रधाराला ही अटक करावी.