बॅनर बाजी कुठेही करता महापुरुषांना तरी सोडा,,,
कल्याण
राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बॅनर बाजी करताना आपण कुठे बॅनर लावतोय. याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. कारण की कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एक बॅनर लावला आहे. या बॅनर वर राममंदिर आणि केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील यांचा फोटो आहे. मत्र हा बॅनर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्मारकासमोरच लावला आहे. ज्यामुळे नेताजींचा पुतळा झाकोळून गेला आहे. त्यामुळे नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांमध्ये ब’नरबाजीची चढाओढ सुरु आहे. या बॅनरबाजी मुळे शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे. काही नेत्यांकडून सांगितले जाते बॅनर बाजी करु नये. मात्र कार्यकर्ते ऐकत नाहीत. बॅनरबाजी करताना कार्यकर्त्यांना हे भान नसते. त्यांच्याकडून बॅनर बाजी कुठे केली जात आहे. खांबावर लवतात. भिंतीवर लावतात. रस्त्याच्या मधोमध लावतात. आत्ता तर २२ तारखेला होणाऱ्या आयोध्येतील कार्यक्रमानिमित्त केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील यांचा बॅनर लावला आहे. हा बॅनर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यासमाेर लावला आहे. त्यामुळे नेताजींचा पुतळा झाकोळून गेला आहे. या ब’नरबाजीमिुळे नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.