डोंबिवली
.
डाेंबिवलीत तरुणांचा हैदोस घातल्याच्या घटना समोर आली आहे. रस्त्यावर कारमध्ये टेप लावून डान्स करीत असताना पोलिसांना थांबविले. त्याचा त्या तरुणांना इतका राग आला की, ते तरुण थेट पोलिस ठाण्यात पोहचले. महिला पोलिसांसमोरच पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला. अश्लील चाळे केलं या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सहा तरुणांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
डोंबिवली टिळनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी रस्त्यावर कार लावून काही तरुण डान्स करीत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्याठिकाणी बीट मार्शल पोहचले. त्यांनी कारमधील मोठ्या आवाजातील टेप बंद केला. पोलिस पोलिस ठाण्यास आले. त्यांच्या मागोमाग डान्स करणारे तरुण पोलिस ठाण्यात पोहचले. या तरुणांनी पोलिस ठाण्यातच धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावरील कपडे काढून ते महिला पोलिसासमोरच धिंगाणा लागले. तरुणांचे हे कृत्य पाहून पोलिस देखील हैराण झाले. या तरुणांना आवार घालणे पोलिसांच्या नाकी नऊ आले. कशा बसे पोलिसांना या तरुणाना ताब्यात घेतले. दोन सगळे भाऊ आणि त्यांच्या एक मित्र आणि काही तरुण यामध्ये सामील होते या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी विलास भुंजग, राजू भुजंग, सिद्धार्थ गायकवाड आणि त्यांचे साथीदारांना अटक केली आहे. यामधील विलास भुजंग याच्या विरोधात यापूर्वी पोलिस ठाण्यात पाच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.