सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात
बारा हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
ठाणे अँटी करप्शन ब्युरो ची कारवाईr :- घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी 12 हजरांची लाच स्वीकारणाऱ्या कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे अँटी करप्शन ब्युरो च्या पथकाने रंगेहाथ अटक केली . राज कोळी असं या अधिकाऱ्याचं नाव असून तक्रारदाराकडे त्याने 24 हजाराची मागणी केली होती . तडजोडअंती ही रक्कम बारा हजार रुपये ठरली . आज सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील सह दुय्यम निबंधक कार्यालयात राज कोळी याला बारा हजार रुपये स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो ने सापळा रचत अटक केली . राज कोळी यांच्यासोबत एका खाजगी इसमाला देखील ठाणे अँटी करप्शन ब्युरो ने ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय .