गोळीबाराच्या आधीत आमदारांच्या मुलालाशिवसेना कार्यकर्त्यांनी डिवचले का ?दुसरा सीसीटीव्ही आला समोर

Uncategorized

गोळीबाराच्या आधीत आमदारांच्या मुलाला
शिवसेना कार्यकर्त्यांनी डिवचले का ?

दुसरा सीसीटीव्ही आला समोर

पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार केल्याच्या आधीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड हा वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमधून बाहेर पडताना दिसत आहे. शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे कार्यकर्ते काही तरी बोलत आहेत. वैभव गायकवाडला डिवचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसूनत येत आहे.

उल्हासनगर हिल लाईन पोलिस ठाण्यात भाजप आमदार गायकवाड यानी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड याच्यासह त्याचा साथीदार राहूल पाटील याच्यावर गोळीबार केला होता. हा धक्कादायक सीसीटीव्ही बाहेर आला होता आत्ता वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल जगताप यांच्या केबीन बाहेरचा सीसीटीव्ही समाेर आला आहे. या मध्ये वैभव गायकवाड हे केबीनच्या बाहेर पडतात. तेव्हा महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्याकडून काही तरी बोलले जाते. या नंतर वैभव गायकवाड पुन्हा मागे वळतात. ते ही काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बोलतात. या दरम्यान दोन्ही गटाकडून धक्काबूक्की सुरु होते. पोलिसांकडून मध्यस्थीचा प्रयत्न केला जातो. हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, गोळीबार करण्याच्या आधी गायकवाड यांच्या मुलाला डिवचण्याचा प्रयत्न झाला होता का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *