उल्हासनगरात भाजपा कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचा उल्लंघन केले गुन्हा दाखल

Uncategorized

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून उल्हासनगर मधील सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये 30 ते 40 भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

हे सगळे कार्यकर्ते गोळीबार प्रकरणी आरोपी असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनासाठी उल्हासनगरच्या चोपडा कोर्टाबाहेर घोषणाबाजी करत होते

आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या कोर्टात काल हजर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असताना कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला त्यामुळे भाजपाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांवर उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गणपत गायकवाड ज्यावेळी कोर्टात आले त्यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली

कोण आला रे कोण आला कल्याणचा वाघ आला
भारतीय जनता पार्टीचा विजय असो गणपत शेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है

गरीबों का नेता कैसा गणपत शेठ जैसा

अशा घोषणा भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते तसेच पदाधिकारी एकत्र जमा होऊन घोषणा देत होते
गुड्डू खान, मोना सेठ, निलेश बोबडे, शिलाराज, सुरज खान, अंजली खामकर ,विद्या त्रिंबके ,भावेश तोल ,सरिता जाधव, लावण्य दळवी ,यशोदा माळी ,व इतर 25 ते 30 अनोळखी महिला पुरुष आमदार गणपत गायकवाड समर्थक यांनी जोरजोराने घोषणा देऊन पोलीस उपायुक्त विशेष शाखा आणि शहर यांच्या कडील मनाई आदेशाचा भंग केला म्हणून यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(3) 135 अधिवेशन सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *