केडीएमसी नगररचना विभागातील दोन जणांना अटक

Uncategorized

कल्याण डोंबिवली महापालिकेचा नगररचना विकास विभाग संशयाच्या भोवऱ्यात

कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात काम करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी आज सायंकाळी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी आहेत.या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय .

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम मंजुरीसाठी काही कागदपत्र सादर करण्यात आली होते. .या कागदपत्रात फेरफार करण्यात आल्याची तक्रार केडीएमसीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती . या तक्रारीनुसार पोलिसांनी शहानिशा करत ,दोन महिने तपास करत बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी केडीएमसीच्या  नगररचना विभागातील दोघा सर्वेयरला अटक केली आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राजेश बागुल नगररचना विभागात ड्राफ्ट्समन आहे. तर बाळू बहिराम हा सर्वे करणारा आहे. दोघे
केडीएमसीच्या सर्वेयर विभागात कार्यरत आहेत .दरम्यान या घटनेमुळे केडीएमसीचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय . केडीएमसी नगररचना विभागात अनेक अधिकारी , कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत .त्यांची अन्य विभागात बदली करण्याची तसदी आजतागायत कोणत्याही महापालिका अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याचे दिसून येतंय . जरी बदली झाली असली तरी संबंधित अधिकारी तीन ते चार महिन्यात पुन्हा नगररचना विभागात कार्यरत होत असल्याचं अनेकदा दिसून आलंय . आज  नगररचना विभागातील दोन सर्वेयरना कागदपत्रांमध्ये खाडाखोड करत बनावट कागद पत्रांच्या आधारे केडीएमसीची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर नगररचना विभागातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आलाय .या प्रकरणात मोठे अधिकारी देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *