डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Uncategorized

भिंतीवरील भाजपच्या स्लोगन व कमळ चिन्हाला काळे फासले ,तरुणाला अटक

शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय ते कोपर पर्यंतच्या भिंतीवर भाजपतर्फे कमळ चिन्ह व स्लोगन रंगवण्यात आले होते या स्लोगनला एक तरुणाने काळे फासल्याची घटना समोर आली आहे . या प्रकरणी विष्णूनगर पोलीसानी काळे फासणाऱ्या सम्राट मगरे या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली . सम्राट मगरे हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली . या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून शिवसेना भाजपा मध्ये धुसफूस सुरूच असल्याचे दिसून येतेय.

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय ते कोपर पर्यंतच्या भिंतीवर भाजपतर्फे स्लोगन व कमळ चिन्ह रंगवण्यात आले होते . काल रात्रीच्या सुमारास या स्लोगनला काळे फासण्यात आले . ही बातमी वाऱ्यासारखे पसरतात भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी विश्व नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत याप्रकरणी सम्राट मगरे या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे . सम्राट मगरे हा शिवसेना शिंदेचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली . सम्राट ने हे कृत्य का केलं याचा तपास पोलीस करत आहेत .या घटनेनंतर डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *