कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांच्यावर नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखक
पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे दाखल केले
आरोपींमध्ये महेश गायकवाड, यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड २५ दिवस ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होते.
तब्येत बारी झाल्यानंतर विकास कामे मार्गी लावण्यासाठी सक्रिय झाले
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
त्यांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे. ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे.
तर दुसरीकडे राहुल पाटील यांनी पनवेल हिंद केसरी बैलगाडा शर्यदित राहुल पाटील यांचा बैल मथुर शर्यद हरला त्यामुळे मोठा राडा झाला दगडफेक झाली गोळीबार झाला या प्रकरणी पनवेल पोलिसांनी गुन्हा दाखल करून राहुल पाटील याला अटक केली आहे
या दोघांवर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता या घटनेला एक महिना होऊन जातं नाही तोच पुन्हा महेश गायकवाड आणि राहुल पाटील चर्चेत आले आहेत