दाम्पत्यांचे दागिने लंपास करुन पळणा:या चोरटय़ाला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा
कल्याण टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या एका वयोवृद्ध दाम्पत्याचे लाखोचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरटय़ाला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहे. राजेश घोडविंदे असे या चोरटय़ाचे नाव असून त्याला सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक करण्यात आली आहे.
19 एप्रिल रोजी टिटवाळ्य़ात सत्यभागा डावरे आणि त्यांचे पती भगवंत डावरे हे एका लग्न सभारंभासाठी नाशिकला जाण्याकरीता घरातून निघाले. टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर बसून दोघेही ट्रेनच्या प्रतिक्षेत होते. याच वेळी संधी साधत एका चोरटय़ाने त्यांची पर्स लंपास केली.
पर्समध्ये साडे तीन लाखाचे दागिने होते. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मुंबई रेल्वेचे पोलिस आयुक्त कैसर खालीद यांच्या आदेशानुसार कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरु झाला. पोलिस अधिकारी अरशद शेख यांच्या पथकाला या गुन्हयाचा छडा लावण्यात यश आले पोलिसांनी स्थानकावरील आणि बाहेरील सीसीटीव्हीच्या सहाय्याने अखेर चोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या. राजेश घोडविंदे असे या चोरटय़ाचे नाव असून त्याने चोरी केलेले लाखो रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.