पार्टी दरम्यान भाई लोकांची दबंगगिरी गेली
इंस्टाग्राम वर फॉलोवर वाढले म्हणून युट्युबरने मित्रांना पार्टी दिली मात्र या पार्टी दरम्यान राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी युट्युबर शुभम शर्माला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या मित्राला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात राहणारे शुभम शर्मा हे युट्युबर आहे ते प्रँक व्हिडिओ तयार करतात. युट्युब वर ते खूप प्रसिद्ध आहेत. काही दिवसापूर्वी इंस्टाग्राम वर त्यांचे ३० हजार फॉलोवर पूर्ण झालेत यासाठी शुभम शर्मा यांनी या आनंदाच्या सेलिब्रेशनसाठी कल्याण पूर्वेतील कशीश हॉटेलमध्ये एक पार्टी आयोजित केली. या पार्टी मध्ये त्यांचे काही मित्र सहभागी झाले. हॉटेल मध्ये पार्टी सेलिब्रेट करताना त्या ठिकाणी याच परिसरात राहणारे राहुल पाटील आणि त्यांचे दोन समर्थक आले .शुभमला आणि त्यांचे मित्र कुशाल पाटील याला बघून त्यांनी त्यांचा जवळ घेऊन पाटील यांच्या समर्थकांनी कुशाल याला मारहाण सुरू केली, एवढेच नाही तर शुभम याला धमकी दिली . तुला कल्याण-डोंबिवली राहायचे आहे तर व्यवस्थित राहा असं असा दम ही भरला . याप्रकरणी शर्मा यांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत राहुल पाटील आणि त्यांचे २ समर्थकांचा विरोधात तक्रार दिली आहे संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी एन सी दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनांमुळे कल्याण पूर्वेत भाई लोकांची दबंगगिरी समोर आल्याने कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे