केंद्रीय मंत्री आठवले यांनी घेतली कुटुंबियांची भेटी…
आर्थिक मदतीचे आश्वासन देताच कुटुंबिय संतापले….
आम्हाला मदत नको ,पाणी द्या – कुटुंबाची संतापजनक मागणी..
डोंबिवली : डोंबिवली नजीक संदप गावातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती . या घटनेनंतर या गावातील पाणी समस्या प्रकर्षाने समोर आली. दरम्यान आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी आठवले यांनी गावाला भेडसावणाऱ्या पाणी समस्या बाबत मार्ग काढण्यासाठी आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले.पुढे बोलताना कुटुंबाला 50 हजारांची मदत करण्याचे आश्वासन दिलं. यावेळी या कुटुंबातील सदस्य संतापले आम्हाला पैसे नको, पाणी द्या.आमच्या घरातले सदस्य घेऊन पाण्यावाचून गेलेत ते भरून देणार आहात का आमदार येतात, खासदार येतात तुम्ही आलात मदत कसली करता पाणी द्या,असा संतप्त सवाल त्यांनी आठवले यांना केला.त्यानंतर केंद्रीय मंत्री आठवले यांनी तात्काळ या गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि राजकारण करण्यासाठी नाही आलो. जिल्हाधिकारी तसेच महापालिका प्रशासनाचे देखील या खदानी बुजवणायच्या याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच या गावाला पाणी समस्या सोडवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिले असल्याचे आठवले यांनी सांगितले.
Byte : रामदास आठवले ( केंद्रीय मंत्री )