जिल्हा स्केटींग स्पर्धेत
मीरारोड विजेते तर कल्याण उपविजेता

Uncategorized

कल्याण-रीजन्सी ग्रुप, स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका व स्पोर्ट्स केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी जिल्हास्तरीय रीजन्सी ट्रॉफी -२०२२ ही स्केटिंग स्पर्धा काल 22 मे रोजी शहाडच्या रीजन्सी अंटालिया येथे पार पडली.या स्पर्धेत मीरा रोडच्या स्केट लाइफ क्लबने १४० गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद तर कल्याणच्या सागर क्लबने ६५ गुणासह उपविजेतेपद पटकावले, बदलापूरच्या गार्गी क्लबने ४० गुणांसह तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
ही स्पर्धा क्वाड, बिगीनर्स व इनलाइन या स्केटिंग प्रकारामध्ये घेण्यात आली. स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी रीजन्सी ग्रुप चे डायरेक्टर विकी रुपचंदानी, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्य सुप्रिया नायकर हे उपस्थित होते..स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गितेश वैद्य, देव गायकवाड, संतोष मिश्रा, संतोष चव्हाण, गणेश बागुल , सागर कुलदीप, पवन ठाकूर, गुफरान शेख दीपक कुलदीप अपर्णा सेतुरमान आणि आदित्य निकाळजे यांनी मेहनत घेतली तर या स्पर्धेचे आयोजन

स्केटिंग सचिव अविनाश ओंबासे यांनी केले होते.
या स्पर्धेत आध्या कामत, अन्विता बुटे, रितीशा प्रतिहार, अंश वर्मा, रितेश रेड्डी, अव्यक्त भाबल, देवांश प्रधान, अदिना शाह, अर्जित जोयाशी, अंश साळुंखे, आद्य बरनवाल, सास्वत परीदा तुष्य चुडासमा, अर्णव थोरात, देव विश्वकर्मा, जिया जियाल, अरमान सय्यद, जपज्योत कौर, प्रेम ताना , सायना शक , रुदर पिंपळा, मुर्णमय पाटील तनुष नायर याखेळाडूंनी पदके जिंकली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *