सराईत गुन्हेगारांचा माज उतरविण्यासाठी पोलिसांनी आधी मोका लावला नंतर ज्या भागात त्यांची दहशत होती. त्या भागातून बेडय़ाघालून त्यांना फिरवले. स्थानिकांमध्ये पोलिसंच्या या कारवाईचे खूप कौतूक होत आहे. कल्याणमध्ये पोलिसांची गुंडांमध्ये एकच दशहत पाहावयास मिळत आहे.
कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसात स्थानिक गाव गुंडांनी खूपच दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री दारु पिऊन धिगांणा करणे, वाहनांची तोडफोड करणे, मारहाण करणे सर्व सामान्यांमध्ये दहशत करण्यासाठी गुंडांनी अति केले होते. जॉईन सीपी दत्तात्रय कराळे, डीपीसी सचिन गुंजाळ यांनी या कल्याण डोंबिवलीत गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाई सुरु केली. पोलिसांनी आधी एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत अनेक गुंडांना तुरुंगात पाठविले. त्यापेक्षा जास्त सराईत असलेल्या 12 गुंडांच्या विरोधात मोका लावण्यात आला. कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या आदेशानंतर कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली भागात मोका लावण्यात आलेल्या काही आरोपांना पोलिसांनी बेडय़ा घालून गल्ली गल्लीत फिरविले. हातात बेडय़ा, माना खाली आणि मागे पोलिस होती. ज्या भागात या भाई लोकांची दहशत होती. त्या भागात त्यांना फिरवून पोलिसांनी त्यांची चांगलीच जिरवली आहे. स्थानिक नागरीकांमध्ये पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक केले जात आहे.