कल्याण-कल्याण टिटवाळा मार्गावरील बल्याणीत तिपन्नानगर ते माता मंदिर तामिळू शाळेर्पयतचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आला.
या प्रभागाचे माजी शिवसेना नगरसेवक मयुर पाटील आणि त्यांच्या पत्नी शिवसेना नगरसेविका नमिता पाटील यांनी आमदार भोईर यांच्याकडे आमदार निधी मिळावा अशी मागणी केली होती. आमदार भोईर यांनी सांगितले की, या भागात यापूर्वी विकास कामांचा बोजवारा उडाला होता. त्यासाठी नगरसेविका पाटील यांनी माङयाकडे निधीची मागणी केली. महापालिकेच्या सदस्य मंडळाची मुदत 2क्2क् मध्ये संपली आहे. सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे नगरसेवक निधी मिळत नाही. प्रभागातील अत्यावश्यक कामे पाहता. गरज तिथे निधी या धोरणानुसार मी या प्रभागात विकास कामाला आमदार निधी दिला आहे. तसेच मोहिली येथील महापालिकेच्या पाणी प्रकल्पानजीक नदी शेजारी काही लोक दशक्रिया विधी करतात. त्याठिकाणी शेड व अन्य सोयी सुविधा पुरविण्याचे काम केले जाणार आहे. त्याकरीता निधी दिला आहे. हे कामही सुरु होईल. त्याचबरोबर अन्य एका डांबरी रस्त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. ते कामही लवकर सुरु केले जाईल असे आमदार भोईर यांनी सांगितले.