कल्याण- डोंबिवलीनजीक असलेल्या संदप गावातील खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाणी टंचाईमुळे मृत्यू झाला होता. गायकवाडपाडयात हे कुटुंब राहत होते. गायकवाड वाडी ही दलित वस्ती आहे. या वस्तीला पाणी दिले जात नसल्याच्या निषेधार्थ आज रिपब्लीकन पक्ष आठवले गटाच्या वतीने कल्याण तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
रिपाई नेते प्रल्हाद जाधव, अंकुश गायकवाड आणि रामा कांबळे यांच्यासह अनेक कार्यकत्र्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून तहसील कार्यालयार्पयत मोर्चा काढण्यात आला. दलित वस्तीला पाणी आणि नागरी सोयी सुविधा पुरविल्या जात नाहीत. खदाण मालकांनी खदाणी खोदल्या आहेत. त्यात पाणी साचते. त्यात लोक कपडे धुतात. खाणीला कोणतेही कुंपन नाही. कोणतेही संरक्षक कुंपन नसलेल्या खदाणी बंद करण्यात याव्यात अशी मागणी केली. 15 दिवसांच्या आत या खदाणी बंद केल्या पाहिजेत असा अल्टीमेट तहसील कार्यालयास दिला आहे. या वेळी रिपाई शिष्टमंडळाने नायब तहसीलदार सुषमा बांगर यांची भेट घेऊन त्यांना विविध दहा मागण्यांचे निवेदन दिले.
खदाणी मालकावर सदोष मुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. अमृत योजने अंतर्गत प्रत्येक झोपडपट्टील दलीत वस्तीमध्ये नळ योजना
राबवावी. दलीत वस्तीतील निधी हा पूर्णत: दलीत वस्त्यांमध्ये बापरण्यात यावा. मागासवर्गीय विद्याथ्र्याना श्ष्यिवृत्ती सवलत त्यांच्या खात्यामध्येजमा करावी. सध्या महागाईने त्नस्त संपूर्ण जनता होरपळून निघत असून महाराष्ट्र सरकारने गोरगरिबांसाठी ई श्रम कार्ड धारकांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र सरकारच्या वतीने आर्थिक मदत मिळावी.
अण्णानगर व साईनाथनगर, आयरेगांव डोंबिवली येथील रेल्वे प्रकल्पात काही झोपडपट्टीतील घरे बाधीत होत असून त्यांना अपात्न घोषित केलेले आहे त्यांना पात्न करावे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हरीतील फेरीवाला झोन घोषित करून फेरीवाल्यांना त्याचे ओळखपत्न मिळणोबाबत व त्यांना व्यवसायासाठी कायमची जागा उपलब्ध द्यावी या मागण्या केल्या.