कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील ह, आय आणि इ प्रभागतील बहुमजली बेकायदा इमारतीवर प्रशासनाने कारवाईचा हाताेडा चालविला आहे.ह प्रभागातील नवापाडा परिसरात पवन चौधरी यांच्या तळ अधिक पाच मजली बेकायदा इमारतीचे २८ स्लॅब तोडण्याची कारवाई करण्यात आली.
आय प्रभागातील आडीवली ढोकली येथील घनश्याम जयस्वाल व राजू मिसाळ यांच्या तळ अधिक चार मजली बेकायदा इमारतीवर तसेच दावडी गोळवली येथील राजन ठाकूर यांच्या तळ अधिक सात मजली बेकायदा इमारतीचे ३४ स्लॅब तोडण्याची कारवाई करण्यात आले. जवळपास ४ हजार ५००फूटाचे बेकायदा बांधकाम पाडण्यात आले. सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, सुहास गुप्ते यांनी केली आहे. त्याच प्रमाणे ई प्रभागातील माणगाव येथील राजू वजे यांचे तळ अधिक एक मजली बेकायदा इमारती सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने कारवाई केली आहे.