ँपावसाळ्य़ापूर्वी नालेसफाईचे काम कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सुरु आहे. या नालेसफाईच्या कामाची पाहणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली. यावेळी आमदार ठेकेदारावर भडकले. मी काय मूर्ख आहे का कामधंदे सोडून तुमच्यासोबत फिरतोय. या वेळी आमदार गायकवाड यांनी नालेसफाई संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करीत नाले सफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सूद्धा नालसफाई सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील 95 नाले आहेत. त्याची लांबी 97 किलोमीटर आहे. या नाल्यांच्या सफाईकरीता महापालिकेने 3 कोटी 75 लाख रुपये खर्चाचे टेंडर काढले आहे. नालेसफाईच्या कामाला ठेकेदारामार्फत सुरवात करण्यात आली आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी 30 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करीत नालेसफाईचे काम 31 मे र्पयत पूर्ण करण्यात येईल. मात्र आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी काही ठीकाणी नाले कसे तुंबलेले आहेत. त्यात कचरा साचला आहे. गाळ काढलेला नाही. या बाबी ठेकादाराला दाखवून दिल्या. मी काय मूर्ख आहे का आपले काम धंदे सोडून तुमच्या सोबत फीरतोय. टाईमपास सुरु आहे का या शब्दात ठेकेदारासह अधिका:यांना सुनावले. नालसफाईच्या कामात भ्रष्टाचार आहे. अधिकारी दबून राहतात. नाल्यावरचा प्लोटिंग कचरा स्वच्छ केला जातो. नाल्यातला गाळ काढलाच जात नाही. तसेच 31 मे र्पयत ही नालेसफाई सफाई पूर्ण होणार असे पाहणीतून दिसून आले असे त्यांनी सांगितले.