याला उचलायला किती वेळा घरी गेलो
हे एकताच गुन्हेगाराने पोलिसावर केले सपासप वार

Uncategorized

कल्याण-घरात पार्टी सुरु होती. पार्टी दरम्यान गुन्हेगाराची ओळख करताना पोलिस कर्मचा:याने इतके सांगितले याला ओळखतो मी, तीन वेळा याला उचलायला याच्या घरी गेलो आहे. हे ऐकताच गुन्हेगारने पोलिसावर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. दीपक देशमुख असे या पोलिस कर्मचा:याचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एक महिला सुद्धा या हल्ल्यात जखमी झाली आहे.

कल्याण पश्चिमेतील साई श्री हरी सोसायटीत राहणारे देवेंद्र शास्त्री आणि कल्याणमध्ये कार्यरत पोलिस कर्मचारी दीपक देशमुख यांच्यात मैत्री आहे. काल रात्री शास्त्री यांच्या घरी एक छोटेखानी पार्टी होती. देवेंद्र यांनी दीपक हे पार्टी करीत असताना देवेंद्र यांचा मित्र राजेश काळे त्यांच्या घरी आला. या दरम्यान देवेंद्र यांनी राजेश काळेची ओळख पोलिस देशमुख याच्याशी करुन दिली.

देशमुख यांनी एक वॉरंटबाबत विषय काढला. हा विषय काढताच राजेश काळे आणि दीपक देशमुख यांच्यात वाद झाला. या वादातून राजेश काळे यांनी दीपक यांच्या मानेवर चाकूने हल्ला केला. या दरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या देवेंद्र शास्त्री यांच्या पत्नीच्या हाताला मार लागला आहे. दीपक यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हल्ला करुन पसार झालेल्या राजेश काळेचा बाजारपेठ पोलिस शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *