कल्याण-घरात महिला एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पिडित महिला मानसिक तणावाखाली गेली. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. कसे बसे तिचे प्राण वाचले. या महिलेवर बलात्कार करणा:या नराधमाला कल्याण न्यायालयाने दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.कल्याणचे पोलिस अधिकारी अशोक होनमाने यांनी विशेष सरकारी अधिवक्त्या प्रिती कुलकर्णी यांचा सत्कार केला आहे. त्यांनी आरोपीला शिक्षा व्हायी यासाठी विशेष भूमिका निभावली आहे.
कल्याणमध्ये राहणारी एक महिला 7 जून 2014 साली घरात एकटीच होती. या गोष्टीचा फायदा घेत विजय दिवेकर हा तिच्या घरात घुसला. त्याने त्या महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला. तिने घटनेनंतरच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करुन तिचे प्राण वाचविले. महिलेला डॉक्टरांना सर्व प्रकार सांगितला. कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी अधिवक्त्यांची नियुक्ती केली गेली. विशेष सरकारी अधिवक्ते उज्जवल निकम यांनी प्रथम काम पाहिले. त्यानंतर सरकारी अधिवक्त्या कुलकर्णी यांनी काम पाहिले. आठ वर्षे हा खटला चालला. या प्रकरणा 11 साक्षीदार तपासले गेले. अखेर कल्याण न्यायालयाने 26 मे रोजी आरोपी विजय दिवेकर याला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नराधमाला शिक्षा झाल्यानंतर कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोख होनमाने यांनी सरकारी अधिवक्त्या कुलकर्णी यांचा सत्कार केला.