कल्याण-कल्याण पश्चिमेतील पारनाक्यावर असलेल्या अॅपेक्स खाजगी रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती झालेल्या महिलेवर वेळीच योग्य उपचार न केल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जन्माला आलेल्या बाळाचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. मात्र डॉक्टरांनी या महिलेचा आरोप फेटाळून लावत योग्य उपचार केले. बाळाच्या वारेत रक्तस्त्रव सुरु झाल्याने बाळाला वाचवू शकलो नाही. ही दुदैवी बाब असून त्याचे आम्हाला देखील दु: ख आहे.
कल्याण पश्चिमेतील अशोकनगर वालधूनी परिसरात राहणा:या जयश्री विशाल जपताप हा नऊ नहिच्या गर्भवती होत्या. त्यांचे पती लॉन्डीत काम करतात. जयश्री यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांना अॅपेक्स रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. सकाळी सात वाजल्यापासून प्रसूतीच्या वेदना होत असल्याने डॉक्टर आल्या. त्यांनी कळा बंद होण्याचे इंजेक्शन दिले त्या गेल्यावर ठाण्याहून भूलतज्ञ आल्या. त्यांना वेळ नसल्याने त्याही निघून गेल्या. आधी सिङोरियन करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर पुन्हा सोनोग्राफी करुन माझी नॉर्मल डिलीव्हरी केली. पण जन्माला आलेले बाळ मृत होते. डॉक्टरांनी वेळेच उपचार न केल्याने त्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप जयश्री यांनी केला आहे.
यासंदर्भात डॉ. मानसी घोसाळकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित महिला ही आठ महिन्याची गरोदर होती. तिला कळा सुरु झाल्या तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरु केले. बाळाच्या वारेत रक्तस्त्रव सुरु झाल्याने बाळाच्या ह्रदयाचे ठोके कमी झाले होते. तिच्यावर सुरु असलेल्या उपचाराची सर्व कल्पना तिच्या नातेवाईकांसह तिच्या पतीला दिली गेली होती. ही घटना अत्यंत दुदैवी आहे उपचार करुन देखील बाळाला वाचवू शकलो नाही. बाळाला अॅक्सीडेंटल हॅब्रेज झाल्याने बाळ जन्माला आल्यावर त्याला पुन्हा काचपेटी लागू नये याकरीता तिची प्रसूती सिजेरियन ऐवजी नॉर्मल करण्यात आली. त्यामुळे रुग्ण महिलेचा आरोप चुकीचा आहे. या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे