दादर मधील शिवाजी नाट्य मंदिरात रंगणार भव्य वर्धापन दिन सोहळा. कार्यक्रमात सत्कारमूर्तींना स्वराज्य भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार – समीर चंद्रकांत देसाई ( ठाणे जिल्हाध्यक्ष – शिवराज्य ब्रिगेड महा. राज्य)
मुंबई : महिलांवर होणारे अत्याचार, बहुजनांना अथवा इतरांना बेरोजगारांना रोजगार कसा मिळावा? समाज न्याय हक्क अश्याच समस्यांना घेत गेल्यावर्षी शिवराज्य ब्रिगेड संघटनेची स्थापना करण्यात आली होती. गेल्या वर्षापासूनच आत्तापर्यंत या संघटने मध्ये जास्तीत जास्त युवकांनी आपला सहभाग दर्शविला आहे . येत्या ७ जून रोजी शिवराज्य ब्रिगेडचा पहिला वर्धापन दिन असून दादर पश्चिम येथील शिवाजी नाट्य मंदिरात सायंकाळी ७ वाजता भव्य दिव्य अशा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री आमदार जयवंत पाटील , नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालक मंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमोल मिटकरी, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत , आमदार नाना पटोले, डॉ. राजू वाघमारे, परिमंडळ ५ मुंबई पोलीस उपायुक्त प्रणय अशोक आदी पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून शिवराज्य ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल जाधवराव यांच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य १ला वर्धापन दीन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या सत्कार मूर्तींना स्वराज्य भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अमोल जाधवराव यांनी सांगितले आहे.