कल्याण-द इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ आर्किटेक्टस कल्याण डोंबिवली केंद्राच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त काल 4 मे रोजी डोंबिवलीतील शिवम हॉटेलच्या भव्य सभागृहात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादपर कार्यक्रमात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थीत होते. यावेळी पर्यावरण पूरक वास्तू कशा निर्माण करता येतील यावर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता स. र. तुपे आणि सल्लाकर पी. के. मिराशे उपस्थित होते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने मुख्य अभियंता श्री. स.र. तुपे व महामंडळाचे सल्लागार श्री. पि. के. मिराशे उपस्थित होते. मिराशे यांनी सांगितले की, वास्तुविशारदांची पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये खूप मोठी भूमिका आहे. तर तुपे यांनी एमआयडीसीने पर्यावरण पुरक केलेल्या विविध उपक्र मांची ओळख करून दिली. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी हवामान बदला विरूद्ध सामूहिक कृती करण्याच्या आवश्यकते जोर दिला तसेच महापालिकेच्या विविध उपक्र मांची सर्वाना ओळख करून दिली.
या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व प्रिन्स पाईप्स ह्या कंपनीने केले. कार्यक्र माचे निमंत्नक म्हणून संस्थेच्या वतीने वास्तुविशारद ज्योत्स्ना भिसे यांनी काम पाहिले. संस्थेच्या वतीने कार्यवाह शिरीष नाचणो, सचिव केशव चिकोडी, निमिष दफ्तरी, संदीप पाटील ही वास्तूविसारद मंडळी उपस्थीत होती.