मनसे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

Uncategorized

राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा

कल्याण-कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या भेटीपश्चात राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
मनसेचे आमदार पाटील हे पक्षाचे एकमेव आमदार आहे. त्यांचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चांगलेच सख्य आहे. आमदार पाटील हे यापूर्वी विकास कामांच्या मुद्यावर तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टिेकेचे लक्ष्य करीत होते. तसेच शिवसेना सरकारला धारेवर धरण्याचे काम करीत होते. सत्ता बदलानंतर सत्तेच्या समिकरणात मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठींबा दिला. या पाठिंब्यामुळे नव्या सरकारच्या मंत्री मंडळात मनसेला मंत्री पद मिळणार ही चर्चा सुरु झाली. मनसेचा एक आमदार आहे. त्याला हे मंत्री पद मिळणार ही चर्चा जोर धरु लागली. आज उपमुख्यमंत्री फडणविस यानी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीपश्चात मनसे आमदार पाटील यांनी फडणविस यांची भेट घेतली. मतदार संघातील समस्या व विकास कामांच्या संदर्भात ही भेट असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. मात्र ही सदिच्छा भेट होती की, मंत्री पदासाठीची फिल्डींग ही चर्चा राजकीय वतरुळात रंगली आहे.

ज्या पक्षाकडे एक आमदार आहे तो 40 आमदारांचा मालक होणारे का ?
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीपश्चात चर्चा
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांची प्रतिक्रिया

कल्याण-शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केले. हे आमदार कुठल्या पक्षात जातील याबाबत उत्सुकता आहे. ते आमदार भाजपमध्ये जातील असे बोलले जात होते. ते भाजपमध्ये जाण्यास तयार नाही. ते प्रहारमध्ये जातील. तशीही परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे 40 आमदार कुठल्या गटाचे आणि पक्षाचे असा प्रश्न आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निकालानंतर पक्ष आणि गट स्पष्ट होणार आहे. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीपश्चात ज्या पक्षाकडे एक आमदार आहे. तो पक्ष एका राक्षीत 40 आमदारांचा मालक होईल का अशी चर्चा आहे असे प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

Byte mahesh tapase spoke person ncp

ठाकरे आणि फडवणीसमध्ये नेमकी काय चर्चा झाली ही माहिती समोर आलेली नसल्याने बंडखोर गट मनसेत जाणार का ही चर्चा सध्या तरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *