दोनशे रुपयांची मागणी केली असता महिलेने पैस देण्यास नकार दिल्याने एका सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारासह महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे .महात्मा फुले पोलिसांनी दोघांनी अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील रस्त्यावर एक महिला उभी असताना तिच्या जवळ दोन तरुण आले. या तरुणापैकी एकाने या महिलेकडे दोनशे रुपये मागितले. महिलेने कसले पैसे देऊ तुला असे सांगत नकार दिला. पैसे मागणा:या तरुणाने पैशाचा तगादा जबरदस्तीने करीत होती. अखेर या महिलेने तिच्या एका नातेवाईकाला बोलावून घेतले. हे पाहून पैसे मागणा:या तरुण आणि त्याच्या साथीदाराने महिला आणि तिच्या नातेवाईवर ब्लेडने वार केले. घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. हल्ला करुन पसार झालेला आरोपी ख्वाजा शेख आणि त्याचा साथीदार रहिम शेख या दोघांना पोलिसानी बेडय़ा ठोकल्या आहेत. पोलिस निरिक्षक प्रदीप पाटील यांच्या मागर्दर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत. ख्वाजा शेखच्या विरोधात काही गुन्हे दाखल आहे. केवळ दोनशे रुपयांसाठी महिला व तिच्या नातेवाईकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.