कल्याण-कोरोना नंतर दोन वर्षांनी दहिहंडी उत्साहात साजरा होत असल्याने आज कल्याण डोंबिवलीत राजकीय दहिहंडय़ांचा जल्लोष पाहायवास मिळाला. या उंचीवरील आणि मानाच्या दहिहंडय़ा फोडण्यासाठी गोविंद पथकांमध्ये एकच चढाओढ पाहावयास मिळाली. अनेक ठीकाणी वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांगसह गोविंद पथकांनाही बसला.
गोविंदा रे गोपाला या जल्लोषात कल्याण डोंबिवली नगरी न्हाऊन निघाली होती. त्यातत काही मंडळांनी समाजिक संदेश देणा:या हंडय़ा उभारल्याने त्यांच्या हंडय़ाही लक्षवेधी आणि गर्दी खेचणा:या ठरल्या. डोंबिवलीतील पश्चिमेतील सम्राट चौकात दिपेश म्हात्रे फाऊंडेशन आणि स्वराज मित्र मंडळाने महिला, पुरुष आणि मुंबईतील गोविंद पथकांकरीता तीन हंडय़ा उभारल्या होत्या. मात्र दहिहंडीची सुरुवात सामाजिक संदेश देत कर्ण बधीर मुलांनी केली. संवाद प्रबोधिती या डोंबिवलीती कर्ण बधीर शाळेतील विद्याथ्र्यानी लहानसा थर लावत दहिहंडी फोडण्याचा आनंद लूटला. मुलांनी हंडी फोडताच सगळ्य़ांनी जल्लोष साजरा केला. गोविंदा रे गोपालाच्या गाण्यावर मुलांनी ताल धरला. त्यांच्यावर उडणारा पाण्याचा फवारा त्यांना आणखीनच आनंदात भिजवित होता.
डोंबिवलीतील भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनिषा धात्रक यांच्या ओम गणेश मित्र मंडळाच्या हवना समान पारितोषिक देणारी दहिहंडी लावली होती. प्रत्येकी 22 हजार 222 रुपये पारितोषिक होते. त्यातून त्यांनी महिला पुरुष समानतेचा संदेश दिला. यावेळी गोविंद पथकाने थर लावून सलामी देत गाण्यावर एकच आनंद लूटला
.
डोंबिवलीच्या चार रस्ता चौकात मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने भव्य दहिहंडी उत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. बालश्रीकृष्णाची वेशभूषा करुन येणा:या लहान मुलांना मनसेकडून भेटवस्तू देऊन त्यांचे कौतूक केले. तसेच लकी ड्रा स्कीम बक्षीसही वाटप करण्यात आली.
डोंबिवली शहर भाजपतर्फे यंदाही डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकात दहीहंडी उत्सवाचे दणक्यात आयोजन करण्यात आले आहे .या दही हंडी उत्सवाला
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित आहेत .या दहीहंडी उत्सवाला सकाळपासूनच अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावत थरांची सलामी दिली आहे .दरम्यान भाजपतर्फे आयोजित या दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत.यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोवीड काळातही भाजपतर्फे सर्व निर्बंध आणि नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा केल्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. हिंदू सण आणि हिंदू संस्कृती जपण्याचे काम भाजपतर्फे केले जात असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
कल्याण पूर्व भागातील कुणाल पाटील फाऊंडेशन, विजय पाटील मित्र मंडण आणि राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने 1क् लाख रुपयांची बक्षिसे असलेली हंडी उभारली होती. त्यात अनेक मंडळांनी सलामी दिल्या. त्यांना मंडळाकडून पारितोषिके दिली गेली. याठिकाणीही दहिहंडीचा एकच जल्लोष असल्याने अलोट गर्दी होती.
कल्याणच्या शिवसेना शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख सचिन बासरे यांनी छत्रपती शिवाजी चौकात भव्य दहिहंडी उभारली होती. धनुष्यबाणाला ही दहिहंडी बांधल्याने सध्या धनुष्यबाण कोणाचा ठाकरेंचा की शिंदेचा या वादामुळे ही धनुष्यबाणाची हंडी लक्षवेधी ठरली.