अतिरिक्त आयुक्तांनी घेतली लेट लतिफ कर्मचाऱ्यांची हजेरी

Uncategorized

कल्याण उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस , वर्तणूक सुधारली नाही तर कारवाईचा इशाराkalyan- केडीएमसी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी पावणे दहा वाजता हजेरी लावणे अपेक्षित आहे…. मात्र करोना काळापासून बायोमेट्रिक हजेरी बंद असल्याने के डी एम सी कर्मचारी अधिकारी तासभर उशिराने कार्यालयात येत होते… त्यामुळे कामानिमित्त पालिकेत येणाऱ्या नागरिकांना तासभर ताटकळत उभं राहावं लागत होतं याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आज अखेर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सकाळीच पालिका मुख्यालय घाठल पालिकेच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या या लेत लतिफ अधिकारी कर्मचाऱ्यांची अतिरिक्त आयुक्तानी चांगलीच हजेरी घेतली.त्यांना खडे बोल सुनावत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे….

शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची वेळ सकाळी पावणेदहा ते पावणे सहा असताना कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात मात्र सारं काही अलबेल सुरू असल्याचे दिसून येत होतं. करुणा काळात बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली त्यानंतर ती आजतागायत सुरू झालेले नाही. बंद असलेली ही बायोमेट्रिक हजेरी लेट लकी कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या मात्र पथ्यावर पडल्याचे दिसून येत होतं. पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी पावणेदहा वाजता कार्यालयात हजेरी लावून अपेक्षित असताना हे कर्मचारी तास-दीड तास उशिराने आपल्या कार्यालयात येत होते त्यामुळे आपल्या विविध कामांसाठी पालिकेत येणार्या नागरिकांना मात्र या अधिकाऱ्यांची वाट बघत तास दीड तास ताटकळत उभे राहावे लागत होतं.. याबाबत अनेकदा नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या अखेर या तक्रारीची दखल पालिका आयुक्तांनी घेतली… आज सकाळी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिका मुख्यालय गाठलं …पालिकेचे प्रवेशद्वारावर उभे राहून उशिराने येणाऱ्या या कर्मचारी,अधिकार्यांची हजेरी घेतली… धक्कादायक म्हणजे या उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंत्यासह, मुख्य लेखा अधिकारी देखील होते . याबाबत अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी आज या अधिकाऱ्यांना समजलेत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे इथून पुढे जर वर्तणूक अशीच राहिली तर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *