Uncategorized

कल्याण नाजीक मांडा व गोवेली परिसरात ३९ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल

२४ लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश

कल्याण: १० ऑक्टोबर २०२२

महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा व गोवेली परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या ३९ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडील २४ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात महावितरणच्या पथकाला यश आले.

जगदीश दशरथ देशमुख (राहणार म्हारळ, वरप), किशोर चव्हाण, संतोष सखाराम, काजल गुप्ता, विकी भालेराव, राजेंद्र बटपागड, राज सिद्धार्थ गस्टे, भुषण जाधव, दीपक भालेराव, मनिषा सुर्यवंशी, महेंद्र सुर्यवंशी, नागेश पैई, प्रिया शिंदे, संतोष गायकवाड, बारकू शिंदे, राहूल जखिरे, प्रकाश दिनकर, अब्बास शेख, बलराम नवशा बकुळे, झाकीर कुरेशी, संगिता प्रभू नाथ, सईरा अब्दूल लतिफ, गीता जयस्वाल, यास्मिन रगवी, भगवानदास गुप्ता, मोहम्मद इकलेक, अल्लाउद्दीन शेख, फिरोज जुबेदुल्ला साबा, सरफराज शोकीया, इसामाउद्दीन खान, श्रीमुर्ती मोर्या, अनवर उन्निसा, सुनिल मदनलाल गुप्ता, मीना पाल, सागर शाहा, सरफराज अहमद शाहा, वैशाली उबाळी, आकाश गायकवाड, सुनिल कुवड (सर्व राहणार टिटवाळा, ता. कल्याण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून व वीज मीटर टाळून परस्पर वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे.

उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता निलेश महाजन आणि कनिष्ठ अभियंता धनंजय पाटील त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *