रस्त्यांची नाही, संपूर्ण शहराची जबाबदारी तुमची आहे. पंचवीश वर्षे तुम्ही राज केले. लोकांना खोटी आश्वासने दिली. रस्ते करू दांडिया पुरते बोलता रस्ता खराब आहे. गटारावरती झाकण नाही. लोकं आम्हाला मारतील. आम्हाला निवडून दिले आहे तर आम्ही या समस्येबाबत नेतृत्व करणारच असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लगावला आहे.
काही दिवसापूर्वी रस्त्याबाबत केलेल्या प्रश्नावर असे सांगितले होते, मी खासदार आहे. मी लोकप्रतिनिधी आहे. शहरातील विकास कामांची जबाबदारी माझी आहे.
मनसे आमदार परत एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी पत्रकार आणि नागरीकांसोबत नांदिवली येथील स्वामी समर्थ मठ परिसरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती म्हणजे असे का बोलले जात आहे. याचा अर्थ असा की या परिसरात दहा मिनिटे पाऊस पडला तर रस्त्याला नदीचे स्वरुप येते. अनेक वर्षापासून नागरीक त्रस्त आहेत. मनसेने या करीता आंदोलन ही केले. हा भाग कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात येतो. आज मनसे आमदार राजू पाटील यांनी या भागाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान आमदार पाटील यांच्या सोबत अधिकारी वर्गही उपस्थित होते. राजू पाटील या परिसरात पोहचले. त्यावेळी नागरीक जमा झाले. नागरीक प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात अतिशक आक्रमक आहेत. परिसराच्या पाहणी नंतर राजू पाटील यांना अधिकारी वर्गास या संदर्भात सूचना दिल्या. आत्ता ही समस्या सुटणार की नाही हे पाहावे लागेल. परंतू यावेळी राजू पाटील यांनी सत्ताधार्यावर जोरदार हल्ला बोल केला.