केडीएमसीच्या अधिका:यांच्या सही शिक्क्याच्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करुन इमारतीची परवानगी मिळवून रेराचे नोंदणी प्रमाणपत्र देखील घेतले गेले. या प्रकरणी महापालिकेने 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र सगळ्य़ात आधी ज्या प्रकरणात सगळयात आधी हा प्रकार उघडकीस अला होता त्या प्रकरणात महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये. या बाबत विचारपूस करण्यात आली तेव्हा आयुक्तांसह सर्व अधिका:यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणात केडीएमसीची बनवाबनवी सुरु आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात 27 आणि रामनगर पोलिस ठाण्यात 38 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या बिल्डरांच्या विरोधात आरोप आहे की, या सगळ्य़ांनी महापालिकेच्या अधिकारी वर्गाच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन इमारतीची परवानग्या तयार केल्या. तसेच रेराकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणाचा तपास आत्ता एसआयटीकडे आहे. मात्र या बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्यापूर्वी सगळ्य़ात आधी अशा प्रकारची फसवणूक सुरु आहे याची माहिती भाजप नगरसेवक मंदार हळबे यांनी उघडकीस आणला. वास्तू विशारद अनामिका दातार यांच्या नावाचा गैरवापर करुन महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्यासह एका बिल्डरने डोंबिवलीत भली मोठी इमारत उभी केली. त्याचा रेरा प्रमाणपत्रही मिळविले होते. केडीएमसीने 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात केडीएमसी का गुन्हा दाखल करीत नाही. या बाबत महापालिका आयुक्तांकडे विचारणा केली असता नगररचना अधिका:यांकडून माहिती घ्या. या बाबत प्रमुख अधिकारी दीक्षा सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आकडे साहेबांशी जाणून घ्या. आकडे साहेबांनी केदारे यांच्याकडे विचारणा करा. या प्रकरणात आयुक्तांसह सर्व अधिकारी टोलवाटोलवी करीत आहे. हेच यातून उघड होत आहे. या बाबत मंदार हळबे आणि वास्तूविशारद दातार यांनी एक दिवसीय उपोषण करण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाली नसली तरी हळबे हे उपोषणाच्या मुद्यावर ठाम आहेत.