कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका कामगारांना 16 हजार 500 रुपये बोनस जाहिर करण्यात आला आहे. ही घोषणा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास आणि पदाधिकारी रवी पाटील यांनी आयुक्तांची आज भेट घेतली. कामगारांना 25 हजार रुपये बोसन दिला जावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. मागच्या वर्षी 15 हजार 500 रुपये बोनस दिला गेला होता. यंदा त्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यंदा 16 हजार 500 रुपये बोनस जाहिर करण्यात आला आहे. बोनसची रक्कम येत्या बुधवार्पयत कामगारांच्या खात्यात जमा होईल असे आयुक्तांनी सांगितले. रेग्यूलर, ठोकपगारी, कंत्राटी, परिवहन आणि शिक्षण खात्यातील कामगारांना हा बोनस दिला जाणार आहे. केवळ वर्ग एक आणि दोनच्या अधिका:यांना बोनस दिला जाणार नाही हे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. बोनस जाहिर होताच कामगारांनी आनंद व्यक्त करीत एकमेकांना पेढे भरविले.