Anbrnath चाणक्य 2500 वर्ष पूर्वी सांगून गेले चोर-उचक्के डाकू लुटेरे बलात्कारी आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, त्यावेळी राजा चाणक्य होते आता प्रधानमंत्री आहे हे सगळे एकत्र आलेत याचा अर्थ असा आहे की देशाचे प्रधानमंत्री योग्य दिशेने जातायत. अंबरनाथ येथील भाजपच्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांना चोर उचक्के डाकू बलात्कारी अशी उपमा दिली . एवढेच नाही तर यांना देश वाचवायचा नाही संविधान वाचवायचं नाही हे सर्व पक्ष मालकी तत्त्वावर चालणारे आहेत. भाजप चे मायबाप जनता आहे असे त्यांनी म्हटले. मोदी @9 अंतर्गत अंबरनाथ मध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं .या सभेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नऊ वर्षात केलेला विकास कामाचा लेखाजोखा मांडला तसेच विरोधकांवर सडकून टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी मोदी@9 अंतर्गत राज्यभरात उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचे दौरे सभा सुरू झाल्यात .या पार्शवभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ शहरात जाहीर सभा झाली..
केंद्रीय राज्य पंचायत मंत्री कपिल पाटील ,सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण ,आमदार निरंजन डाखवरे,आमद्रा गणपत गायकवाड,आमदार किसन कथोरे ,आमदार कुमार आयलानी,माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवणार ,कोरोना काळा नंतर आपण जो श्वास घेतोय ते फक्त नरेंद्र मोदीना मुळे घेतोय ,देश महा सत्तेकडे जाताना दिसतोय ते पण मोदींनमुळेच सांगितले. नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी या 9090902024 मोबाईल नंबर वर प्रत्येकाने मिसकॉल द्या आपल्याला 400 खासदार येत्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणायचे आहेतअसे आवाहन यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केले.केंद्रिय राज्यमंत्री कपिल यांनी गेल्या नऊ वर्षात विकासाच्या दृष्टिकोनातून जी प्रगती झाली आहे ती प्रगती सर्व विरोधी पक्षांच्या डोळ्यात खुपसतेय आहे अशी टीका करत भाषणाला सुरुवात केली पुढे बोलताना मंत्री पाटील यांनी विरोधी पक्षांना देश चालवायचा नाही,संविधान वाचवायचे नाही..हे सर्व पक्ष मालकी हक्काचे पक्ष काँग्रेस पासून शरद पवार राज ठाकरे नितेश कुमार हे सर्व मालकी तत्त्वाचे पक्ष आहेत पक्षाचे नाव घेऊन सर्व नेत्यांच्या उदाहरण त्यांनी दिला . हे सर्व स्वतःचे पक्ष वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत,चोर ,लुटरे एकत्र आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, तस हे आहे ,सगळे एकत्र आले आहे म्हणजे मोदी योग्य दिशेने चालले आहेत असा टोला विरोधकांना लगावला .