अब्दुल गफ्फार शेख, Author at Bedhadak Bol Kalyan Live News Portal https://bedhadakbol.com/author/abdul/ Latest News from Kalyan, Thane, Dombivali and Maharashra Thu, 05 Jan 2023 10:47:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 टिटवाळा मधील धक्कादायक प्रकार https://bedhadakbol.com/titwala-kalyan-news/ https://bedhadakbol.com/titwala-kalyan-news/#respond Thu, 05 Jan 2023 10:47:13 +0000 https://bedhadakbol.com/?p=1158 प्रियकराने मित्राच्या मदतीने ३५ वार करत केली प्रेयसीची हत्या प्रियकर व त्याचा साथीदार गजाआड Anchor : प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने आपल्या एका मित्रासोबत विविहित महिलेची ३५ वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे उघडकीस आली आहे .मयत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथे राहत होती.टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढलुन आल्यानंतर आधार कार्डच्या सहाय्याने तिची […]

The post टिटवाळा मधील धक्कादायक प्रकार appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
प्रियकराने मित्राच्या मदतीने ३५ वार करत केली प्रेयसीची हत्या

प्रियकर व त्याचा साथीदार गजाआड

Anchor : प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने आपल्या एका मित्रासोबत विविहित महिलेची ३५ वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे उघडकीस आली आहे .मयत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथे राहत होती.टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढलुन आल्यानंतर आधार कार्डच्या सहाय्याने तिची पोलिसांनी ओळख पटवली व तिची हत्या करणारा प्रियकर जयराज चौरेसह त्याचा मित्र सूरज धाटे या दोघांना अटक केली ..

टिटवाळा येथील गोवेली परिसरात १२ डिसेंबरला एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्राने तब्बल 35 वार करण्यात आले होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान महिलेजवळ तिच्या आधार कार्ड सापडले होते या आधार कार्डच्या आधारे या मयत महिलेची ओळख पटवली. या मयत महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला.. रुपांजली जाधव असे महिलेचे नाव असून ते पुण्याला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रुपांजली जाधव ही विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. दोन वर्षांपासून रुपांजलीचे पुण्यात राहणाऱ्या जयराज चौरे याच्याशी प्रेमसंबंध होते . रुपांजली जयराज कडे लग्नासाठी तगादा लावत जयराजला ब्लॅकमेल करत होती..त्यामुळे जयराज संतापला होता .अखेर जयराज ने रुपंजलीला संपवण्याचा निर्णय घेतला .जयराजने रूपांजलीला दागिने घेऊन देतो असे सांगत तिला टिटवाळ्याला घेऊन आला. टिटवाळा येथील गोवेली परिसरात जयराज व त्याचा मित्र सुरज घाटे यांनी रुपांजलीवर धारदार शस्त्राने वार करत त्याच्या हत्या केली व तेथून पळून गेले. रुपांजली असा काटा काढण्यासाठी त्याने मित्र सोबत तिची हत्या करण्याचा कट रचला होता . यासाठी त्यांनी उल्हासनगर येथून दोन चाकू देखील खरेदी केले होते .अखेर टिटवाळा पोलिसांनी जयराज व त्याचा मित्र सुरज या दोघांना अटक केली आहे .

The post टिटवाळा मधील धक्कादायक प्रकार appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/titwala-kalyan-news/feed/ 0
हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत https://bedhadakbol.com/diva-singapore/ https://bedhadakbol.com/diva-singapore/#respond Wed, 04 Jan 2023 11:39:16 +0000 https://bedhadakbol.com/?p=1154 दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , […]

The post हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला

मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला

कल्याण ग्रामीण : प्रतिनिधी

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के यांना टोला हाणत सांगितले की , हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे.अश्या शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी टोला लगावला आहे.

दिवा शहरात ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के नुकतेच आले होते. यावेळी आपल्या भाषणात दिवा शहराचा विकास आमाचा पक्ष आणि नेते करत आहेत असे म्हस्के ठासून सांगत होते. त्यावेळी आम्हाला पण सिंगापूर बनवायचे आहे,असे वक्तव्य केले आणि याच भाषणाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. आता यावरूनच मनसे आमदार यांनी टोला हाणत सांगितले की खरं तर खूप हस्यासपद बोलले आहेत ते,माझे मित्र नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते. उपमहापौर दिव्यात राहतात. ८ वर्षात काय दिवे लावले असते ते दिसले असते ना ! सिंगापूर करायच्या हे वार्ता करतात. सिंगापूरला कचऱ्याच्या प्रकल्प मधुन खत बनते, त्याच्यावर गार्डन बनवले आहेत. तर आमच्या दिव्यात हे कचरा आणून टाकत आहेत.हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे आणि याची ती गँग आहे, ते अजून दिवा ओरबाडत आहेत. त्यामुळे लोकांना गृहीत धरून आम्ही सिंगापूर करू मग मत द्या, हे आता त्यांनी विसरावं लोक काही एवढी मूर्ख राहिली नाहीत, त्यांना यावेळेस दिवेकर जो धडा द्यायचा तो देतील. असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

The post हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/diva-singapore/feed/ 0
केडीएमसीची फसवणूक मात्र पहिल्या प्रकरणाची तक्रार नाहीच..का केली जात आहे टोलवाटोलवी https://bedhadakbol.com/kdmc-cheating/ https://bedhadakbol.com/kdmc-cheating/#respond Fri, 14 Oct 2022 11:16:49 +0000 https://bedhadakbol.com/?p=984 केडीएमसीच्या अधिका:यांच्या सही शिक्क्याच्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करुन इमारतीची परवानगी मिळवून रेराचे नोंदणी प्रमाणपत्र देखील घेतले गेले. या प्रकरणी महापालिकेने 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र सगळ्य़ात आधी ज्या प्रकरणात सगळयात आधी हा प्रकार उघडकीस अला होता त्या प्रकरणात महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये. या बाबत विचारपूस करण्यात आली […]

The post केडीएमसीची फसवणूक मात्र पहिल्या प्रकरणाची तक्रार नाहीच..<br>का केली जात आहे टोलवाटोलवी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
केडीएमसीच्या अधिका:यांच्या सही शिक्क्याच्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करुन इमारतीची परवानगी मिळवून रेराचे नोंदणी प्रमाणपत्र देखील घेतले गेले. या प्रकरणी महापालिकेने 65 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल केला आहे. मात्र सगळ्य़ात आधी ज्या प्रकरणात सगळयात आधी हा प्रकार उघडकीस अला होता त्या प्रकरणात महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये. या बाबत विचारपूस करण्यात आली तेव्हा आयुक्तांसह सर्व अधिका:यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणात केडीएमसीची बनवाबनवी सुरु आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात 27 आणि रामनगर पोलिस ठाण्यात 38 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या बिल्डरांच्या विरोधात आरोप आहे की, या सगळ्य़ांनी महापालिकेच्या अधिकारी वर्गाच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन इमारतीची परवानग्या तयार केल्या. तसेच रेराकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणाचा तपास आत्ता एसआयटीकडे आहे. मात्र या बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्यापूर्वी सगळ्य़ात आधी अशा प्रकारची फसवणूक सुरु आहे याची माहिती भाजप नगरसेवक मंदार हळबे यांनी उघडकीस आणला. वास्तू विशारद अनामिका दातार यांच्या नावाचा गैरवापर करुन महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्यासह एका बिल्डरने डोंबिवलीत भली मोठी इमारत उभी केली. त्याचा रेरा प्रमाणपत्रही मिळविले होते. केडीएमसीने 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात केडीएमसी का गुन्हा दाखल करीत नाही. या बाबत महापालिका आयुक्तांकडे विचारणा केली असता नगररचना अधिका:यांकडून माहिती घ्या. या बाबत प्रमुख अधिकारी दीक्षा सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आकडे साहेबांशी जाणून घ्या. आकडे साहेबांनी केदारे यांच्याकडे विचारणा करा. या प्रकरणात आयुक्तांसह सर्व अधिकारी टोलवाटोलवी करीत आहे. हेच यातून उघड होत आहे. या बाबत मंदार हळबे आणि वास्तूविशारद दातार यांनी एक दिवसीय उपोषण करण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाली नसली तरी हळबे हे उपोषणाच्या मुद्यावर ठाम आहेत.

The post केडीएमसीची फसवणूक मात्र पहिल्या प्रकरणाची तक्रार नाहीच..<br>का केली जात आहे टोलवाटोलवी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kdmc-cheating/feed/ 0
राष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंची बाजी https://bedhadakbol.com/kalyan-boys/ https://bedhadakbol.com/kalyan-boys/#respond Fri, 14 Oct 2022 09:42:20 +0000 https://bedhadakbol.com/?p=980 कुमिते प्रकारात सुवर्ण पदक विजेते – अर्चित पाटील.रजत पदक विजेते – नैतिक राऊत, गौरवी तारी, उजाला यादव.कांस्य पदक विजेते – ओम कांबळे, प्रांजल कुतरवाडे, मंजिरी कुतरवाडे, आशिष सहेजराव, सुमेध गायकवाड.काता प्रकारात सुवर्ण पदक विजेते – ओम कांबळे, अर्चित पाटील, प्रांजल कुतरवाडे, गौरवी तारी.रजत पदक विजेते – सिध्दी काकड, सुमेध गायकवाड.कांस्य पदक विजेते – नैतिक राऊत, […]

The post राष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंची बाजी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
गुजरात राष्ट्रीय कराटे स्पर्धा कल्याण :- गुजरात येथे वर्ल्ड गोजू - रू कराटे डो, च्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया या संस्थेमार्फत कल्याणच्या खेळाडूंनी कुमिते आणि काता या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करत 21 पदकांची लयलूट केली. वलसाड गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या 7 व्या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यस्थान, मध्य प्रदेश, वेस्ट बंगाल व अन्य राज्यांतून उत्तोत्मतम खेळाडूंनी सहभागी झाले होते. सर्व वेजेते खेळाडूंना सेंसाई महेश चिखलकर यांचे प्रशिक्षण लाभले व शिहान भाईदास देसले यांचे मार्गदर्शन लाभले. विजेते विद्यार्थांचे कल्याण क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.

कुमिते प्रकारात सुवर्ण पदक विजेते – अर्चित पाटील.
रजत पदक विजेते – नैतिक राऊत, गौरवी तारी, उजाला यादव.
कांस्य पदक विजेते – ओम कांबळे, प्रांजल कुतरवाडे, मंजिरी कुतरवाडे, आशिष सहेजराव, सुमेध गायकवाड.
काता प्रकारात सुवर्ण पदक विजेते – ओम कांबळे, अर्चित पाटील, प्रांजल कुतरवाडे, गौरवी तारी.
रजत पदक विजेते – सिध्दी काकड, सुमेध गायकवाड.
कांस्य पदक विजेते – नैतिक राऊत, मंजिरी कुतरवाडे, उजाला यादव, चेतना साळुंके, आशिष सहेजराव.

The post राष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंची बाजी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-boys/feed/ 0