वरातीत नाचताना तरुणाचा दुर्दैवी अंत, मृत्यूचं कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल

कल्याण सोसीअल
वरातीत नाचताना तरुणाचा दुर्दैवी अंत, मृत्यूचं कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मिरवणुकीत वाजणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजात एका तरुणाचा मृत्यू झाला. मिरवणुकीत डीजेच्या मोठ्या आवाजात व्हिडीओ बनवताना हा तरुण जोरात खाली पडला आणि पुन्हा उठलाच नाही. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उज्जैनजवळील अंबोडिया धरणावर राहणारा लाल सिंह (18) हा त्याचा मित्र विजय याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ताजपूरला आला होता. गावात नवरदेवाची वरात निघाली होती आणि मिरवणुकीत लालसिंग त्याच्या मित्रांसह डीजेच्या तालावर नाचत होता. यादरम्यान तो मोबाईलवर व्हिडिओही बनवत होता. त्यानंतर अचानक नाचत असताना लालसिंग बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी लाल सिंहला मृत घोषित केले.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लाल सिंह याच्या हृदयात रक्ताची गुठळी जमा झाल्याचे स्पष्ट झाले. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हा प्रकार घडल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर जितेंद्र शर्मा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *