सोसीअल Archives - Bedhadak Bol Kalyan Live News Portal https://bedhadakbol.com/category/social/ Latest News from Kalyan, Thane, Dombivali and Maharashra Fri, 14 Oct 2022 13:25:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 कल्याण आणि डोंबिवलीत साचलेल्या पाण्यात प्रवास लय भारी https://bedhadakbol.com/kalyan-dombivali-water-loging/ https://bedhadakbol.com/kalyan-dombivali-water-loging/#respond Fri, 14 Oct 2022 13:22:12 +0000 https://bedhadakbol.com/?p=994 पावसामुळे डोंबिवलीतील नांदिवली परिसरआणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा रस्ता झाला जलयमनागरीकांसह वाहन चालकांना काढावी लागली साचलेल्या पाण्यातूच वाट डोंबिवली-केडीएमसी आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु झाला की, रस्त्यावर पाणी साचते. परिस्थिती इतकी भयानक होते. रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होते. या परिस्थिती नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डोंबिवलीतील नांदिवली परिसर आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा […]

The post कल्याण आणि डोंबिवलीत साचलेल्या पाण्यात प्रवास लय भारी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
पावसामुळे डोंबिवलीतील नांदिवली परिसर
आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा रस्ता झाला जलयम
नागरीकांसह वाहन चालकांना काढावी लागली साचलेल्या पाण्यातूच वाट

डोंबिवली-केडीएमसी आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु झाला की, रस्त्यावर पाणी साचते. परिस्थिती इतकी भयानक होते. रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होते. या परिस्थिती नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डोंबिवलीतील नांदिवली परिसर आणि कल्याण मुरबाड रोडवरील कांबा परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरीकांची चांगली गैरसोय झाली आहे.

डोंबिवलीच्या नांदिवली येथील सर्वोदय पार्क परिसरात पावसाचे पाणी साचून नागरीकांना या समस्येचा सामना करावा लागतो. या प्रश्नावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वारंवार आवाज उठविला आहे. तसेच सत्ताधा:यांना टिकेचे लक्ष केले आहे. कालच आमदार पाटील यांनी या भागाची पाहणी अधिकारी वर्गासोबत केली. अधिकारी वर्गाला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर टिकेचे लक्ष केले होते. आज पुन्हा सायंकाळी पाऊस पडला पुन्हा नांदिवली सूर्योदय पार्क परिसरात पाणी साचून हा परिसर जलमय झाला. नागरीकांना पुन्हा जलमय परिस्थितीचा सामना करावा लागला. या साचलेल्या पाण्यातूनच नागरीकांना वाट काढावी लागली. आमदारांनी केलेली पाहणी ताजी असताना त्यातून अधिकारी वर्गाने काही एक बोध न घेतल्यानेच आज पुन्हा त्याठिकाणी परिसर जलमय झाला.
एकीकडे नांदिवली परिसरात ही परिस्थिती असताना दुसरीकडे कल्याण मुरबाड हा नगरकडे जाणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. म्हारळ पाडा ते कांबा, वरप दरम्यानचा रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावरही आज पावसाचे पाणी साचून रस्ता जलमय झाला होता. या जलमय रस्त्यातून वाट काढताना नागरीकांसह वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली.

The post कल्याण आणि डोंबिवलीत साचलेल्या पाण्यात प्रवास लय भारी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-dombivali-water-loging/feed/ 0
कल्याण रेल्वे यार्डात मध्य रेल्वेचे मॉकड्रिल https://bedhadakbol.com/kalyan-nock/ https://bedhadakbol.com/kalyan-nock/#respond Thu, 19 May 2022 06:23:43 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=662 मॉकड्रिलमध्ये एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीम सहभागी कल्याण : मध्य रेल्वे मुंबई विभाग दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ सोबत संयुक्त कवायती आयोजित करतो जेणेकरून मोठी दुर्घटना घडल्यास विविध संबंधितांची सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासला जाईल. या संदर्भात आज कल्याण अप यार्ड येथे कवायती घेण्यात आली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण […]

The post कल्याण रेल्वे यार्डात मध्य रेल्वेचे मॉकड्रिल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
मॉकड्रिलमध्ये एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीम सहभागी

कल्याण : मध्य रेल्वे मुंबई विभाग दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ सोबत संयुक्त कवायती आयोजित करतो जेणेकरून मोठी दुर्घटना घडल्यास विविध संबंधितांची सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासला जाईल.

या संदर्भात आज कल्याण अप यार्ड येथे कवायती घेण्यात आली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण करण्यात आली. जिथे ट्रेन क्र. 11139 चा एक डब्बा रुळावरून घसरला आणि ट्रेन क्र.11021 च्या शेजारील डब्याला धडकून दोन्ही गाड्यांना आग लागली. एक अशी परिस्थिती निर्माण झाली, जिथे प्रवासी जळत्या कोचमध्ये अडकले होते.

सकाळी १०.३३ वाजता कवायत सुरू झाली आणि क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी मुंबई विभागाच्या आपत्कालीन नियंत्रणास त्वरित संदेश दिला. नियंत्रण कार्यालयाने तात्काळ कारवाई केली आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अपघात निवारण ट्रेन, रेल्वे मेडिकल रिलीफ व्हॅन, रेल्वेचे नागरी संरक्षण कर्मचारी यांनी प्रथम प्रतिसाद दिला. अग्निशामक यंत्रे वापरली आणि प्रवाशांची सुटका केली त्यानंतर अग्निशमन दल १०.४१ वाजता पोहोचले. एनडीआरएफची टीम १०.४५ वाजता घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मोठे बचाव कार्य सुरू केले.

ताबडतोब डबा वरून आणि खिडक्यांमधून कापला गेला आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ जवान डब्यात दाखल झाले. अग्निशमन दलाने फायर हायड्रंटचा वापर केला आणि रेल्वे रुग्णवाहिका देखील १०.४० वाजता पोहोचली आणि जखमी प्रवाशांना त्वरित वैद्यकीय मदत दिली गेली. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वेच्या आरपीएफनेही एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश केला आणि ११.०२ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणली. ११.२७ वाजता सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि रेल्वेच्या डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यंत्रणेतील सर्व भागधारकांचा प्रतिसाद चांगला आणि जलद असल्याचे दिसून आले आणि संपूर्ण परिस्थिती एका तासात नियंत्रणात आली. कल्याणच्या अपघात निवारण ट्रेनने ११.५५ वाजता रुळावरून घसरलेल्या कोचला पुन्हा रुळांवर आणण्याचे काम पूर्ण केले.

या कवायतींमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत होते आणि वास्तविक वेळी मोठ्या प्रमाणात यामुळे मदत होते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला अपघात शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे. तथापि, अशी कोणतीही अनुचित घटना घडल्यास सज्जतेसाठी आणि द्रुत प्रतिसादासाठी या कवायती रेल्वेकडून संयुक्तपणे सुरू राहतील.

या कवायतीचे संयोजन मुंबई विभागाच्या संरक्षा विभागाने केले. रॉबिन कालिया, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी, मुंबई विभाग, शशांक मेहरोत्रा, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि डॉ. रुद्र अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधीक्षक, कल्याण रेल्वे रुग्णालय, इतर रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

The post कल्याण रेल्वे यार्डात मध्य रेल्वेचे मॉकड्रिल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalyan-nock/feed/ 0
कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ https://bedhadakbol.com/kalamboli-dombivali-news/ https://bedhadakbol.com/kalamboli-dombivali-news/#respond Mon, 16 May 2022 09:31:05 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=653 अखेर आजीबाईला पोलिसांनी घरी पोचविले.. डोंबिवली-24 तासापासून एक वयोवृद्ध आजीबाई एका दुकानासमोर रडत बसली होती. या आजीबाईला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. मानपाडा पोलिसांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. या आजीबाईला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.डोंबिवली पूर्व परिसरात घरडा सर्कल येथील एका […]

The post कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
अखेर आजीबाईला पोलिसांनी घरी पोचविले..

डोंबिवली-24 तासापासून एक वयोवृद्ध आजीबाई एका दुकानासमोर रडत बसली होती. या आजीबाईला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. मानपाडा पोलिसांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. या आजीबाईला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.
डोंबिवली पूर्व परिसरात घरडा सर्कल येथील एका हॉटेलसमोर एक आजीबाई 24 तासापासून बसली होती हॉटेल मालक तिला जेवण देत होता. मात्र ती फक्त रडत होती. तिला केवळ तिचे नाव आणि पती, मुलगा मुलीचे नाव आठवत होते. तिला तिच्या जिल्ह्याचे नाव माहित होते. ती फक्त इतकेच सांगत होती की, माझी मुलगी मला घेण्यासाठी येईल. हॉटेल मालकाच्या लक्षात आले की, ही आजीबाई हरविली आहे. त्याने ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी त्वरीत पोलिस अधिका:यांना या आजीबाईच्या नातेवाईकांचा पत्ता शोधण्यास सांगितले. पोलिस अधिकारी अविनाश ओनवे, पोलिस कर्मचारी विजय कोळी, राजेंद्र खिल्लारे, मंजा पवार यांनी आजीबाईला विश्वात घेत तिच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. त्वरीत पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना संपर्क केला. ज्या समाजाच्या आईबाजी आहे. त्या समाजाचे लोक कोणत्या गावात राहतात. याची माहिती घेतली. त्या गावातील लोकांना संपर्क साधून आजीबाईच्या मुलांचा नंबर सोधून काढला. तिचा मुलगा संतोष पवार हा त्याच्या आईचा शोध घेत होता. संतोष पवार यांना मानपाडा पोलिस ठाण्यात बोलावून त्याच्या आईला त्याच्या स्वाधीन केले. आजीबाई ही रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मुरडव गावात राहते. तिची मुलगी नवी मुंबईतील कळबोळी येथे राहते. आजीबाईने रत्नागिरीहून कळंबोळीला येण्यासाठी बस पकडली. बस चालकाने तिला कळंबोळी ऐवजी डोंबिवली ऐकून तिला डोंबिवलीत उतरविले. यामुळेच हा घोळ झाला. पोलिसानी अथक प्रयत्न करुन आजीबाईला तिच्या घरांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.

The post कळंबोली ऐवजी डोंबिवली ऐकल्याने झाला होता घोळ appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/kalamboli-dombivali-news/feed/ 0
कर वाढविला पण सुविधांची वाणवा https://bedhadakbol.com/goat-market-kalyan/ https://bedhadakbol.com/goat-market-kalyan/#respond Sat, 14 May 2022 15:35:15 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=643 कल्याण नजीक कोंगांव बकरा मंडी की कथा कल्याण-कल्याणनजीक असलेल्या कोनगावातील बकरा मंडीत विक्रेत्यांकडून ८ रुपये कर वसूल केला जात होता. त्यात वाढ करुन थेट २५ रुपये करण्यात आला. कर वाढ केली मात्र मंडीत सुविधा दिल्या जात नाही. सुविधा पुरविल्या तर आम्ही कर भरण्यास तयार आहोत अशी भूमिका बकरा विक्रेत्यांनी घेतली आहे. बकरा विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष […]

The post कर वाढविला पण सुविधांची वाणवा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण नजीक कोंगांव बकरा मंडी की कथा

कल्याण-कल्याणनजीक असलेल्या कोनगावातील बकरा मंडीत विक्रेत्यांकडून ८ रुपये कर वसूल केला जात होता. त्यात वाढ करुन थेट २५ रुपये करण्यात आला. कर वाढ केली मात्र मंडीत सुविधा दिल्या जात नाही. सुविधा पुरविल्या तर आम्ही कर भरण्यास तयार आहोत अशी भूमिका बकरा विक्रेत्यांनी घेतली आहे.


बकरा विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष परवेज शेख यांनी माहिती दिली की, मुंबई सोडले तर सगळ्य़ात मोठा बकरा विक्रीचा बाजार कोनगावातील आहे. हा बकरा बाजार भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येतो. याठिकाणी आठवडय़ाला ३० हजार बक:यांची विक्री होती. शनिवार आणि रविवारी बाजार जास्त तेजीत असतो. एक बकरा बाजारातून विकून बाहेर नेताना त्याच्या मागे ८ रुपये कर लावला जातो. हा कर वाढविण्यात आला आहे. आत्ता २५ रुपये कर भरावा लागत आहे. कर वाढविला असला तरी त्याठिकाणी विक्रेत्याना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. बाजार अवघ्या दीड एकर इतक्या अपु:या जागेत चालविला जातो. त्यासाठी किमान पाच एकराची जागा उपलब्ध करुन दिली पाहिजे. जागा वाढवून दिले तर अडते वाढतील. व्यापारही वाढेल.
याठीकाणी पाण्याची सुविधा नाही. पाणी नसल्याने बकरे आणि विक्रेत्यांना त्रस सहन करावा लागतो. आत्ता उन्हाचा तडाखा आहे. त्यात बक:यांना पाणी लागते. दिवसाला २ कोटी रुपयांपेक्षा जास्तीची उलाढाल बकरा विक्रीतून होते. शनिवार आणि रविवारी ही उलाढाल ३ कोटी रुपयांच्या घरातही जाते. राज्यांतून आणि राज्याबाहेरूनही बक:यांचा माल येतो. देवनार नंतर कोन गावातील बकरा बाजार मोठा आहे. त्या तुलनेत काही सुविधा दिल्या जात नाही. सुविधा नसताना कर वाढ लादली जात आहे. वाढविलेला कर भरण्यास आमची हरकत नाही. कर वाढविण्या आधी सुविधा पुरविणो गरजेचे आहे. सुविधा दिल्यास आम्ही करही भरु असे शेख यांनी सांगितले.

The post कर वाढविला पण सुविधांची वाणवा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/goat-market-kalyan/feed/ 0
कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजनबडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी https://bedhadakbol.com/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82/ https://bedhadakbol.com/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82/#respond Fri, 13 May 2022 12:16:00 +0000 https://sscmrmba.in/newslive/?p=630 कल्याण-एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये येत्या 19 ते 22 मे दरम्यान प्रॉपर्टी एक्सो 2022 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघनटेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी दिली आहे.या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष शितोळे यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जयेश तिवारी, अरविंद वरक, सुनिल चव्हाण, राहूल कदम, दिनेश मेहता, […]

The post कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन<br>बडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
कल्याण-एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये येत्या 19 ते 22 मे दरम्यान प्रॉपर्टी एक्सो 2022 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघनटेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी दिली आहे.
या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष शितोळे यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जयेश तिवारी, अरविंद वरक, सुनिल चव्हाण, राहूल कदम, दिनेश मेहता, राजेश गुप्ता, रवी पाटील, रोहित दिक्षीत, संजय पाटील, अनिरुद्ध पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीत 40 ते दीड लाख रुपये किंमतीची घरे आहेत. सीटी सेंटरीकमध्ये ही किंमत आहे. तर शहराच्या आऊट स्कर्टमध्ये 20 लाखापासून घरे उपलब्ध आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत परवडणारी घरेही निर्माण केली जात आहेत. कोरोना काळानंतर घर खरेदीत तेजी पाहावयास मिळत आहे.

बिल्डरांकडून वसूल केला जाणारा एलबीटी आणि मेट्रो सेस कर रद्द करावा

कल्याण-राज्य सरकारकडून स्टॅम्प डय़ूटीच्या माध्यमातून एलबीटी कर वसूल केला जातो. तसेच मेट्रो सेसही वसूल केला जात आहे. ही कर वसूली बिल्डरांकडून वसूल केली जात असला तरी राज्य सरकारच्या धोरणानुसार परवडणारी घरे देण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. त्यामुले एलबीटी आणि मेट्रो सेस कर वसूली रद्द करावी अशी मागणी कल्याण डोंबिवली एमसीएचआयचे या बिल्डर संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केली आहे.

The post कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन<br>बडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82/feed/ 0
…म्हणून बाळासाहेब कायम आनंद दिघेंवर रागवायचे, उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘मातोश्री’वरचा किस्सा https://bedhadakbol.com/fighter-plane-crash-during-world-war/ https://bedhadakbol.com/fighter-plane-crash-during-world-war/#respond Mon, 24 Jul 2017 07:13:13 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=110 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post …म्हणून बाळासाहेब कायम आनंद दिघेंवर रागवायचे, उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘मातोश्री’वरचा किस्सा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
मुंबई, 07 मे :  ‘आनंद दिघे (anand dighe) हे ‘झुकेंगा नही साला’ असेच होते, हिंम्मत असेल तर समोर या. हिंमत असेल तर टक्कर दे. असेच होते. बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेले आनंद दिघे होते, त्यांचा माणूस आणि शिवसैनिक पुन्हा होणे नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीना उजाळा दिला.

दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे  यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’  (dharmveer anand dighe movie) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाँच झाला. या सोहळ्याला बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता सलमान खान देखील हजर होता. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

‘काही काही क्षण असे असतात शब्द सुचत नाही. त्या काळामध्ये आपण जातो आणि शब्द सुचत नाही, असं आता माझं झालं आहे. शाल आणि गुच्छ आणि दिला त्यावेळी नाव राखलं आणि निष्ठा राखलं असं वाटलं. सिनेमाचा ट्रेलर पाहिला तेव्हा शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरू आणि शिक्ष असं हे नातं जपणार हा एकमेव पक्ष असणार आहे.  आणि ही भावना असल्यामुळे अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांना संपवून शिवसैनिक पुढे गेली’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.

.

The post …म्हणून बाळासाहेब कायम आनंद दिघेंवर रागवायचे, उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘मातोश्री’वरचा किस्सा appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/fighter-plane-crash-during-world-war/feed/ 0
वरातीत नाचताना तरुणाचा दुर्दैवी अंत, मृत्यूचं कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल https://bedhadakbol.com/best-food-that-you-need-to-eat-for-breakfast/ https://bedhadakbol.com/best-food-that-you-need-to-eat-for-breakfast/#respond Mon, 24 Jul 2017 07:10:19 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=135 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post वरातीत नाचताना तरुणाचा दुर्दैवी अंत, मृत्यूचं कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
वरातीत नाचताना तरुणाचा दुर्दैवी अंत, मृत्यूचं कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मिरवणुकीत वाजणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजात एका तरुणाचा मृत्यू झाला. मिरवणुकीत डीजेच्या मोठ्या आवाजात व्हिडीओ बनवताना हा तरुण जोरात खाली पडला आणि पुन्हा उठलाच नाही. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उज्जैनजवळील अंबोडिया धरणावर राहणारा लाल सिंह (18) हा त्याचा मित्र विजय याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ताजपूरला आला होता. गावात नवरदेवाची वरात निघाली होती आणि मिरवणुकीत लालसिंग त्याच्या मित्रांसह डीजेच्या तालावर नाचत होता. यादरम्यान तो मोबाईलवर व्हिडिओही बनवत होता. त्यानंतर अचानक नाचत असताना लालसिंग बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी लाल सिंहला मृत घोषित केले.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लाल सिंह याच्या हृदयात रक्ताची गुठळी जमा झाल्याचे स्पष्ट झाले. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हा प्रकार घडल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर जितेंद्र शर्मा यांनी सांगितले.

The post वरातीत नाचताना तरुणाचा दुर्दैवी अंत, मृत्यूचं कारण ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/best-food-that-you-need-to-eat-for-breakfast/feed/ 0
मित्राच्या खांद्यावर बसून DJच्या तालावर नाचत होता नवरदेव, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं https://bedhadakbol.com/top-trending-software-for-2017/ https://bedhadakbol.com/top-trending-software-for-2017/#respond Thu, 20 Jul 2017 11:30:45 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=39 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post मित्राच्या खांद्यावर बसून DJच्या तालावर नाचत होता नवरदेव, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
मित्राच्या खांद्यावर बसून DJच्या तालावर नाचत होता नवरदेव, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं

सूरत : गुजरातमधल्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  हळदीत मित्रांसोबत डीजेवर नाचत असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील ही घटना आहे. 33 वर्षीय मितेश भाई चौधरी याचं लग्न बालोद तालुक्यातील धामंडळा गावातील मुलीशी ठरलं होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. घरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. लग्नाला काही तासच शिल्लक होते, लग्नाच्या आदल्या रात्री हळदीत मितेश नातेवाईक आणि मित्रही सहभागी झाले होते.

आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेच्या तालावर नाचत होती. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही स्वत:ला रोखता आलं नाही आणि तोही मित्रांसोब नाचू लागला. नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर बसवलं आणि नाचायला सुरुवात केली. पण अचानक मितेशच्या छातीत दुखू लागलं.

The post मित्राच्या खांद्यावर बसून DJच्या तालावर नाचत होता नवरदेव, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/top-trending-software-for-2017/feed/ 0
सूनेला एकटी पाहून सासऱ्याची फिरली नजर, सूनेनं अशा जागी घेतला चावा की सासरा… https://bedhadakbol.com/new-trending-wedding-fashion/ https://bedhadakbol.com/new-trending-wedding-fashion/#respond Thu, 20 Jul 2017 11:05:16 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=43 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post सूनेला एकटी पाहून सासऱ्याची फिरली नजर, सूनेनं अशा जागी घेतला चावा की सासरा… appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>

सून घरात एकटी असल्याने सासऱ्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण सूनने स्वत:च्या बचावासाठी उचललं हे धक्कादायक पाऊल.

  
सूनेला एकटी पाहून सासऱ्याची फिरली नजर, सूनेनं अशा जागी घेतला चावा की सासरा...

मुंबई : घरात सून एकटी पाहून सासरचं मन डळमळलं. त्याने सुनेच्या खोलीत घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मग सुनेने स्वत:चा बचाव करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्यात यश न आल्याने तिने दाताने सासरचा प्रायव्हेट पार्टला कापला. यानंतर सासऱ्याने जखमी अवस्थेत घरातून पळ काढला. मात्र तोपर्यंत आवाज ऐकून आलेल्या लोकांनी सासऱ्याला पकडलं.

जौनपूरच्या मुंगराबादशाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात काल रात्री ही लज्जास्पद घटना घडली. येथे प्रायव्हेट पार्ट कापल्यामुळे जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महिलेचा नवरा बाहेर गावी काम करतो. लग्नापासून सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तो अनेकदा चुकीचे हावभाव करत असे. तिने विरोध केल्यावर तो तिला मारहाण करायचा. बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तो माझ्या खोलीत घुसला आणि बलात्काराचा प्रयत्न करू लागला. असा आरोप महिलेने केला आहे.

The post सूनेला एकटी पाहून सासऱ्याची फिरली नजर, सूनेनं अशा जागी घेतला चावा की सासरा… appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/new-trending-wedding-fashion/feed/ 0
Saif Amrita: ‘त्या घटनेनंतर सैफचं फ्रायपॅनने डोकं फोडाणार होती अमृता https://bedhadakbol.com/saif-amrita-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%ab%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0/ https://bedhadakbol.com/saif-amrita-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%ab%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0/#respond Tue, 18 Jul 2017 08:07:37 +0000 http://demo.mysterythemes.com/news-portal/?p=99 Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

The post Saif Amrita: ‘त्या घटनेनंतर सैफचं फ्रायपॅनने डोकं फोडाणार होती अमृता appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
Wafer cake sweet roll cheesecake ice cream gingerbread sweet. Wafer gingerbread apple pie cotton candy jelly. Toffee oat cake oat cake toffee tootsie roll muffin sugar plum.

Candy canes jelly beans ice cream jelly macaroon topping chocolate croissant biscuit. Chupa chups marshmallow oat cake croissant bonbon. Biscuit macaroon halvah soufflé marzipan. Macaroon icing oat cake sesame snaps carrot cake jelly-o.

Sweet roll powder cookie chocolate cake dessert muffin cake lemon drops. Soufflé halvah fruitcake sweet roll muffin. Wafer danish cupcake jelly cookie. Jelly-o marshmallow oat cake brownie.

Caramels muffin chupa chups. Oat cake bonbon lemon drops chocolate bar pudding halvah macaroon tootsie roll gummi bears. Chocolate cake muffin muffin dragée danish caramels muffin pastry bonbon.

The post Saif Amrita: ‘त्या घटनेनंतर सैफचं फ्रायपॅनने डोकं फोडाणार होती अमृता appeared first on Bedhadak Bol Kalyan Live News Portal.

]]>
https://bedhadakbol.com/saif-amrita-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%ab%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0/feed/ 0