Kalyan

Amjad khan हत्येचा कट रचणारा जळगाव कोर्टातन पकडला गेला तर साथीदार कल्याण मध्ये पिस्तूलसह मंगला एक्सप्रेसमध्ये अटक Anc जळगावमध्ये एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर हा तरुण जेलमधून सुटून बाहेर आला. धम्मप्रियची गोळया घालून हत्या करण्यात आली. बापासमोरच मुलाला मारले होते. मुलाची हत्या करणा:या आरोपीला मारण्यासाठी बाप मनोहर सुरडकर थेट जळगाव कोर्टात गेला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनोहर […]

Continue Reading

महावितरणचा भोंगळ कारभार

महावितरणचा भोंगळ कारभार

कल्याण पूर्वेतील आशेळे गावातील घटना

पैसे भरून ही मीटर नाही ..आमदार गणपत गायकवाड संतापले

महावितरण अधिकाऱ्यावर आमदारांची आगपाखड

जोपर्यंत मीटर देत नाही …तोपर्यंत इथून हलणार नाही

कल्याण ग्रामीण : सहा महिन्यापूर्वी पैसे भरून देखील वीज कनेक्शन न मिळाल्याने कल्याण पूर्व आशाळे परिसरातील काही इमारतींमधील रहिवाशांना अंधारात राहावे लागतेय. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी आज परिसरात जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला जोपर्यंत या रहिवाशांना वीज पुरवठा होत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी टेबल खालून पैसे घेतलेल्याना मीटर देण्यात येते व सरकारी नियमानुसार ज्यांनी पैसे भरले त्यांना मीटर दिले जात नाही असा गंभीर आरोप केला..याबाबतचा व्हिडिओ आसल्याचा देखील खुलासा त्यांनी केला . याबाबत घटनास्थळी असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत चौकशी करून उचित कारवाई केली जाईल व या रहिवाशांना वीज कनेक्शन देण्यात येईल असे आश्वासन दिले

कल्याण पूर्व आषेळे परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून काही इमारतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे .वीज चोरी प्रकरनी बिल्डर विरोधात महावितरणने कारवाई केली .मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.. पैसे भरल्यानंतर सहा महिने उलटून गेले तरी अद्याप मीटर कनेक्शन न दिल्याने येथील नागरिकांना सहा महिन्यापासून अंधारात राहावे लागतेय. याबाबत आज स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी परिसरात जाऊन महावितरण अधिकार्‍यांना धारेवर धरत त्यांना जाब विचारला.. जोपर्यंत वीज पुरवठा केला जात नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका आमदार गणपत गायकवाड यांनी घेतले.. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी टेबल खालून पैसे घेऊन मीटर लावले जातात कायदेशीर रित्या पैसे भरलेल्यांना मीटर दिले जात नाही असा गंभीर आरोप महावितरणवर केला .याबाबतचा व्हिडियो असल्याचे देखील आमदारांनी सांगितले कसा प्रकारे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांचा कामकाज कशा प्रकारे सुरू याचा खुलासा देखील आमदार गायकवाड यांनी अधिकारी वर्गाचा समोर केला .तर याबाबत महावितरण सावध पवित्र घेत याची चौकशी केली जाईल व या इमारतीचे रहिवाशांना तत्काळ वीज कनेक्शन दिली जाईल असे सांगितले.

Continue Reading

टिटवाळा मधील धक्कादायक प्रकार

प्रियकराने मित्राच्या मदतीने ३५ वार करत केली प्रेयसीची हत्या प्रियकर व त्याचा साथीदार गजाआड Anchor : प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने आपल्या एका मित्रासोबत विविहित महिलेची ३५ वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे उघडकीस आली आहे .मयत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथे राहत होती.टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढलुन आल्यानंतर आधार कार्डच्या सहाय्याने तिची […]

Continue Reading

बाळासाहेबांच्या शिवसेनेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी पक्षप्रवेश….

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चार माजी नगरसेवकांसह उद्धव गट, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश, मुंबई येथील माननीय मुख्यमंत्री यांच्या शासकीय वर्षा ह्या निवासस्थानी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा प्रमुख नेते मुखमंत्री, एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश…योगेश म्हात्रेपूजा म्हात्रेदत्ता गिरीगोरखनाथ जाधवसंजीव ताम्हाणे उपशहर संघटक उद्धव गटमुकेश भोईर युवा […]

Continue Reading

संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील सर्व मॉलमधील “हर हर महादेव ”चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला

ठाणे : यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप संभाजी राजे यांनी केला आहे. त्यानंतर आज संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्ह्यामधून ‘हर हर महादेव’ चित्रपटावर ब्रिगेड आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे […]

Continue Reading

संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील सर्व मॉलमधील “हर हर महादेव ”चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला

ठाणे : यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप संभाजी राजे यांनी केला आहे. त्यानंतर आज संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्ह्यामधून ‘हर हर महादेव’ चित्रपटावर ब्रिगेड आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे […]

Continue Reading

चोरटय़ा पोलिसांचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयात

टिटवाळ्य़ा पोलिस ठाण्यात चोरीचे भंगार विकणा:या दोन पोलिसाना निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी या दोन्ही पोलिसांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही पोलिसांनी कल्याण न्यायालयातअतरिम जामीनासाठीअर्ज केला आहे. लवकर यावर सुनावणी होणार आहे. मात्र पोलिसांवर पोलिस ठाण्यातून चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शरद आव्हाड आणि […]

Continue Reading

तरुणांना रोजगाराच्या उपलब्धतेसाठी ग्रोथ सेंटर गरजेचा

निळजे गावातील जेष्ठ ग्रामस्थांची आमदार राजू पाटील यांच्या समोर स्पष्टोक्ती १० गावांच्या योग्य नियोजनासाठीव एकत्रित विकासासाठी ग्रोथ सेंटर गरजेचं असल्याचं ग्रामस्थांच मत ग्रोथ सेंटरच्या बाजूने सर्वात पहिला मनसे पक्ष व राजू पाटील राहिले- आ. राजू पाटील प्रतिक्रिया ” आपल्या इथे होऊ घातलेला ग्रोथ सेंटर आहे. जो २०१६ साली जाहीर झाला होता. त्या संदर्भात निळजे गावात […]

Continue Reading

रेरा प्रकरणात 40 बिल्डरांची बॅक खाती गोठविली
एसआयटीकडून जिल्हाधिकारी, तहसील, आयुक्त, रजिस्ट्रार यांना सूचना

Kalyan रेरा प्रकरणात एसआयटीने आत्ता बिल्डरांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. 40 बिल्डरांची बँक खाती गोठविण्यात आली असून खोटी कागदपत्र प्रकरणात तहसीलदार, रजिस्ट्रेशन कार्यालय केडीएमसी आयुक्तांना एसआयटीने पत्र व्यवहार करुन सर्व प्रकारची पूढील प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली आहे. इतकेच नाही तर सरकारी जागेवर किती ठिकाणी अतिक्रमण झाले आहे यासंदर्भातही माहिती मागितली गेली आहे. कल्याण डोंबिवली […]

Continue Reading

विश्वविक्रम वीर विशाख कृष्णस्वामीचे डोंबिवलीकरांनी केले जाहीर कौतुक!

गेल्या ६१ दिवसांपासून दररोज ४५ किलोमीटर नियमित पणे धावून विश्वविक्रम करून डोंबिवलीचे नाव जगभरात पोहोचविणारा डोंबिवलीकर उत्साही युवक विशाख कृष्णास्वामी याने आज सकाळी ८:०० वाजता विश्वविक्रम केल्यामुळे त्याचे अभिनंदन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री भाऊसाहेब दांगडे पाटील साहेब जातीने उपस्थित राहून त्यांनी विशाखचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेच्या अग्निशमन […]

Continue Reading