मुंबई : समंथा रुथ प्रभू ही चित्रपटसृष्टीतील सर्वात फॅशनेबल आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे यात काहीच शंका नाही. समांथाची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना आवडते. अलीकडेच समांथा पीकॉक मॅगझिनची कव्हर गर्ल बनली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्यापासून चाहते स्वतःला रोखू शकत नाहीयेत. या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या शरीराबद्दल आणि त्वचेबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे.
त्वचेत कम्फर्टेबल असण्याबद्दल समंथा म्हणाली
समंथा रुथ प्रभूने तिची त्वचा आणि शरीर आरामदायक असण्याबद्दल सांगितलं आणि म्हणाली, “मला खात्री आहे की, खूप काम केल्यानंतर, मी आता म्हणू शकते की, मी खूप आनंदी आहे. हा आत्मविश्वास वयाबरोबर येतो. आरामदायक होण्यासाठी थोडा वेळ लागला. स्किन आणि आता मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रयोग करू शकते. ते एखादे सेक्सी गाणं असो किंवा हार्ड कोअर एक्शन, मी कदाचित याआधी असं करण्याचं धाडस केलं नव्हतं.