हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करण्याचा डोंबिवलीतील २५० सार्वजनिक मंडळांचा निर्धार

डोंबिवली

मंडळाच्या दोन हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

डोंबिवली : हिंदुत्वासाठी भाजपलाच सहकार्य करणार असल्याचा निर्धार डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी केला. रविवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संत सावळाराम क्रीडा संकुल येथील मेळाव्यात मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.
मंत्री चव्हाण यांनी माझे हात बळकट करण्यासाठी साथ द्या असे आवाहन करताच रविंद्र चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा उपस्थित मंडळींनी दिला.

भारताला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असून जगभरात भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले आहे. आता राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी सगळ्यांची साथ महत्वाची आहे अशी भावनिक साद चव्हाण यांनी घातली, त्याला प्रतिसाद देत शेकडो मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी समर्थन दर्शवले.

भाजपच्या १४३ विधानसभा मतदारसंघाचीही रविवारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते अशांचा मंत्री चव्हाण यांनी मेळावा घेतला, त्यालाही चार हजार कार्यकर्ते उपस्थित होते. संत सावळाराम क्रीडा संकुलामधील नमो रमो दांडिया रास उत्सवाच्या पेंडॉलमध्ये मेळावा संपन्न झाला. त्यावेळी जिल्हाद्यक्ष नाना सूर्यवंशी ,माजी नगरसेवक मंदार हळबे, राहुल दामले, मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, शैलेश धात्रक, विकास म्हात्रे, खुशबू चौधरी, मंदार टावरे, साई शेलार, शशिकांत कांबळे, नंदू परब, विनोद काळण, राजन आबाळे, समीर चिटणीस, विश्वदिप पवार, राजू शेख, निलेश म्हात्रे, पूनम पाटील यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूकिला कसे काम करावे, प्रचार प्रसार कसा करावा, मतदारांपर्यन्त काय मुद्दे न्यावेत याबाबत मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळीही उपस्थितांनी जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणांनी सभामंडप दणाणून सोडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *