सुजित ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त तानाजी मोरे यांच्याकडून व्हीलचेअर वाटप
इम्तियाज खान
भिवंडी- देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजित उर्फ पप्या ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावात देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजी मोरे यांच्या वतीने दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. देवा ग्रुप फाऊंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यासाठी सदैव तत्पर असते. देवा ग्रुप फाऊंडेशनचे पदाधिकारी समाजातील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नेहमीच संघर्ष करीत असतात. समाजसेवेच्या जोरावर देवा ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. आज 4 मार्च रोजी देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजित ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावात फाउंडेशनचे सचिव तानाजी मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिव्यांग नागरिकांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी बर्थडे बॉय सुजित ढोले स्वतः उपस्थित होते. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुजित ढोले यांचा विशेष सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर देवा ग्रुप महाराष्ट्राचे सचिव तानाजी मोरे, सोनाळे, वालशिंद, घोलगाव, एलकुंडे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मनीषा तानाजी मोरे, देवा ग्रुपच्या ठाणे शहर अध्यक्षा आरती पितळे आदींच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अनंता शेलार, अमृत शेळके, ऋतिका भोईर, जागृती विशे, रघुनाथ पाटील, दशरथ सुतार, प्रकाश उबेरसाडा, रमेश गायकवाड, पूजा पिंगळे, वैजयंता चांदमारे आदी देवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दिव्यांग नागरिक व त्यांच्या नातेवाईकांनी देवा ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक करत मोफत व्हीलचेअर मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आतापर्यंत आम्हाला कोणीही व्हीलचेअर दिली नाही पण देवा ग्रुपने आम्हाला मदत केली आहे. जे कोणी करत नाहीत ते देवा ग्रुप करतात, अशी भावना दिव्यांगांनी व्यक्त केल्या.