डोंबिवली नागरीकांना सोयी सुविधा चांगल्या मिळत नसल्याने आज सोशल मिडियाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेल्या जन आंदोलनास डोंबिवलीकरांनी अल्प प्रतिसाद दिला . या आंदोलनात काही लोकं सामिल झाली होती. विशेष म्हणजे प्रशासनावर हल्लाबोल करण्याऐवजी मिडियालाच दोष देण्याचे काम सुरु केले. मनसे कार्यालय वगळता कुठेही ब्लॅक आऊट झाले नाही.
शहरात रस्ते चांगले नाही. रस्त्यावरील खड्डे बूजविले जात नाही. त्याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी होते. वाहन चालकांचा वेळ वाया जातो. तसेच त्यांच्या वाहनांचा दुरुस्ती खर्च करावा लागतो. त्याचबरोबर शहरातील ठिकठिकाणी कचरा साचला जातो. तो वेळेवर उचलला जात नाही. या विविध समस्यांच्या विरोधात आज नागरीकांनी उत्स्फूर्तपणे डोंबिवली पूर्व भागातील अप्पा दातार चौकात रात्री जमावे. ब्लॅक आऊंट पाच मिनिटांसाठी करुन निषेध व्यक्त करावा. तसेच थाळी नाद आणि घंटा नाद करीत निषेध व्यक्त करावा असे आवाहन सोशल मिडियावर करण्यात आले होते. त्यानुसार आज हे आंदोलन मोठय़ा स्वरुपात होऊ शकते अशी दाट शक्यता व्यक्त केली होती. प्रत्यक्षात या आंदोलनाला नागरीकांचा फासरा प्रतिसादच मिळाला नाही. काही मोजकीच लोक रस्त्यावर उतरले होते. रस्ते खराब आहे. कचरा उचलला जात नाही. या समस्येसाठी लोक मोठय़ा प्रमाणात एकत्रित आले नाहीत. केवळ मनसे कार्यालयापूरते ब्लॅक आऊट करण्यात आले होते. काही जणांनी चांगल्या प्रकारे या समस्या मांडल्या. तसेच घोषणा देत निषेध व्यक्त केला. काही लोकांनी चांगल्या प्रकारे हे आंदोलन केले. कामावरुन परतणारे काही लोक या आंदोलनात सहभागी झाले. मात्र त्यापैकी एका व्यक्तीने मिडियाच्या लोकांनाच धारेवर धरत राग व्यक्त केला.
या आंदोलनापूर्वीच बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून आज दुपारीच या आंदोलनावर टिका करण्यात आली होती. तसेच दिवाळी रोषणाईच्या सणानिमित्त ब्लॅक आऊट आंदोलन करुन शहराची बदनामी टाळावी असे आवाहन केले होते. काही नागरिकांनी घरामधून बसून मी लाईट बंद केली असेल तर याची आम्ही खात्री करू शकत नाही