मनसे आमदारांना युवासेनेचे नेते दीपेश म्हात्रे यांचे चोख प्रतिउत्तर
तीन वर्षापासून आमदार आहात. एका रस्त्यावर साचलेले पाणी काढू शकत नाही. आणि पंचवीस वर्षाची गोष्ट करता. तुमच्याकडून होत नाही तर आम्हाल सांगा तर आम्ही करुन दाखवू अशी प्रतिक्रिया युवा सेने नेते दीपेश म्हात्रे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या टिकेवर दिली आहे.
डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली येथील मठ परिसरात दरवर्षी पावसामुळे पाणी साचते. स्थानिक नागरीकांना त्याचा त्रस सहन करावा लागतो. वारंवार तक्रार आंदोलने करुन देखील महापालिकेकडून त्याची दखल घेतली जात नाही. फक्त थातूरमातूर उपाययोजना केली जाते. त्याचा काही एक उपयोग होत नाही. अखेर मनसे आमदार राजू पाटील यांनी या परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान अधिका:यांना सूचना केल्या. यावेळी बोलताना त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नव न घेता त्यांना टोला लगावला. पंचवीस वर्षापासून सत्ता आहे. रस्त्यांची नाही तर शहराची जबाबदारी तुमची आहे. दांडियापूरती खोटी आश्वासने देता अशी टिका केली होती. राजू पाटील यांच्या या टिकेला शिंदे गटातील युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. तीन वर्षापासून तुम्ही आमदार आहात. एका रस्त्याचे पाणी तूम्ही काढू शकतो. पंचवीस वर्षाची चर्चा करता. आम्हाला सांगा आम्ही तिथली समस्या सोडवू असे आव्हान पाटील यांना दिले आहे.