शिवसेना, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि महिला जिल्हा संघटक लता पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार युवा सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल आज संध्याकाळी ७:०० वाजता डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत, डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आजी-माजी नगरसेवक यांच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले