सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह मनसे आमदारांनी केली पाहणी
-डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील उंबार्ली दावडी भाल टेकडीवरील वनविभागाच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन उभे राहावे यासाठी मनसे आमदार राजू पाटील सातत्याने पाठपुरावा करत होते.या प्रयत्नाला यश आले असून पर्यटन विभागाकडून यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय .सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडून सादर केलेल्या आराखड्यास ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर या कामाला सुरुवात होनार आहे .तसेच याठिकाणी बोटॅनिकल गार्डन उभे राहिल्यास डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागाच्या सौन्दर्यात नक्कीच भर पडेल. सोमवारी संध्याकाळी मनसे आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत टेकडी परिसराची पाहणी केली
डोंबिवली पासून हाकेच्या अंतरावर असलेली उंबार्ली टेकडी ही डोंबिवलीचा श्वास बनली आहे. या टेकडीवर वनविभाग व ग्रामस्थ तसेच निसर्गप्रेमीकडून हजारो वृक्ष लावण्यात आली आहे .या टेकडी परिसरातील वनराईमुळे त्या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी विहार करतात. दरदिवस ग्रामस्थ या झाडांना पाणी घालत झाडांचे संगोपन करत असतात .त्यामुळे ही टेकडी डोंबिवली करांचे आवडते ठिकाण बनले आहे .कल्याण ग्रामीण सह डोंबिवलीत पर्यटनाला चालना मिळावी तसेच नागरिकांसाठी वृक्षसंवर्धन आणि विरांगुळ्यासाठी महत्वपूर्ण ठरेल यादृष्टीने कल्याण ग्रामीण भागातील उबार्ली,दावडी,भाल टेकडीवरील वनविभागाच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन उभे राहावे यासाठी मनसे आमदार राजू पाटील गेले २ वर्ष सातत्याने पाठपुरावा करत होते.या प्रयत्नाला यश आले असून पर्यटन विभागाकडून यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडून सादर केलेल्या आराखड्यास ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली की त्वरित या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली