कौटुंबिक वादातून मामाने भाच्याची चाकूचे सपासप वार करून हत्या केल्याची घटना काल रात्री देसलेपाडा परिसरात घडली. यश तिवारी (२२) असे भाच्याचे नाव असून मामा सतिश दुबे (३१)याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सतिश हा देसलेपाड्यातील विनायक कुंडल इमारतीत राहणारी बहिण सरीताकडेच राहतो. रविवारी रात्री सरीताचे वडील आणि तिचा पती संजय यांच्याशी सतिशचा वाद झाला. सतिशने वडीलांना आणि बहिणीच्या पतीला शिवीगाळ केली. त्यावेळी घरात असलेला सरिताचा मुलगा यश याने मामा सतिश याला समजवण्याचा प्रयत्न केला. याचा राग सतिशला आला. त्याने घरातील किचनमधील धारदार चाकू घेतला आणि रागाच्या भरात यश याच्यावर सपासप वार केले. यात यशचा मृत्यू झाला. त्यानंतर खूनी सतीश याला मानपाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणी सपोनि सर्जेराव पाटील अधिक तपास करत आहेत