डोंबिवली ब्लॅक आऊट करणा:या दुदैवी लोकांकडे विकासाची दृष्टी नाही. डोंबिवलीला बदनाम करण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांकडून हे केले जात आहे. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सुरु असलेली विकासाची घोडदौड अशीच सुरु राहणार असे भाष्य युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. डोंबिवलीत आज रात्री नागरीक असुविधांच्या विरोधात रात्री आठ ते आठ वाजून पाच मिनिटार्पयत काही नागरीक ब्लॅक आऊट करणार आहे. या आंदोलनाचा मेसेज सोशल मिडियावर फिरत आहे. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य करण्यात आले.
काही दिवसापासून सोशल मिडियावर एक मेसेज फिरत आहे. नागरी असुविधांच्या विरोधात लोक २० ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते आठ वाजून पाच मिनिटांर्पयत काही नागरीक दिवे बंद करुन ब्लॅक आऊट करुन निषेध नोंदविणार आहे. काही नागरीक अप्पा दातार चौकात जमून त्याठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला मनसेचा देखील पाठींबा आहे. मनसे आमदार राजू पाटील हे सातत्याने रखडलेल्या विकास कामांबाबत सत्ताधा:यांवर टिका करीत आहेत. या आंदोलनाला भाजप देखील छुपा पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात शिंदे विरुद्ध रविंद्र चव्हाण आणि राजू पाटील या तिघांमध्ये राजकीय संघर्ष दिसून येतो.
या बाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांनी डोंबिवली येथील खासदारांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत युवा सेना नेते दिपेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, शहर प्रमुख राजेश मोरे , बंडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या दरम्यान युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवलीच्या विकासाची पावले उचलली गेली. दिवाळी अगोदर 24 तास रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे. कचरा उचलण्यी कामे सुरु आहेत. आयुक्तासह शहर अभियंते रस्त्यावर उतरले आहे. काही विघ्नसंतोषी लोकांनी डोंबिवलीला बदनाम करण्यासाठी ब्लॅक आऊट आंदोलन करीत आहे काही विघ्न संतोषी लोक यात सामील आहेत. त्यांचा आम्ही निषेध करतो. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामाची घोडदौड अशीच सरु राहणार. या .पत्रकार परिषदेच्या दरम्यान राजेश कदम आणि रमेश म्हात्रे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास कामांविषयी चर्चा केली.