रिफायनरी प्रकल्पविरोधात तरुणांचे डोंबिवलीत आंदोलन

Uncategorized

Kalyan कोकणात रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला कोकनवासीयांनी कडाडून विरोध केला आहे. पोटापाण्यासाठी चाकरमानी शहरात नोकरी- व्यवसाय करत असली तरी हा प्रकल्प कोकणात नको या मागणीसाठी चाकरमान्यांनी शहरातही आंदोलन करण्यास सुरुवात केली.रविवारी डोंबिवलीत चाकरमान्यांनी आंदोलन केले. डोंबिवलीमधील चाकरमानी तरुणांनी कोकणात होणाऱ्या रिफायनरी विरोधात डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे एकत्र जमा होवून आंदोलन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व तरुण कोकण वाचवण्यासाठी एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून आंदोलनाला सुरुवात करत फडके रोड गणपती मंदिर पर्यंत रॅली काढून कोकणात होवू घातलेल्या रिफायनरीला विरोध दर्शवला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *