डोंबिवली-मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण डाेंबवलीच्या दाेन दिवसाच्या दाैऱ्यावर हाेते. रविवारी ठाकरे यांनी कल्याणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून काही सूचना केल्या. त्यानंतर सोमवारी ते डाेंबिवलीत दाखल झाले. डाेंबिवलीतील सर्वेश हाॅलमध्य मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काही जणांनी मनसेत प्रवेश केला. बैठकी दरम्यान राज ठाकरे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. डाेंबिवलीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संघटना बांधण्यासाठी पदाधिकाऱ्याना कान मंत्र दिला. राज ठाकरे यांनी सांगितले की, लाेकांशी संपर्क वाढवा. त्याकरीता मनसे कट्टा सुरु करा. लाेक शाखेत येऊन व्यक्त हाेत नाहीत. कट्ट्यावर व्यक्त हाेतात. लाेकांची पक्षाबद्दल काय मत आहे.. हे जाणून घ्या. या पार्श्व भूमीवर जून महिन्यात मनसे कटट्या बाबत डाेंबिवलीतील मनसे नेत्यांची माेठी कार्य शाळा घेण्यात येणार आहे.