कल्याण डोंबिवलीतील दोन महत्त्वाचे पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळत नाही तसेच प्रशासकीय राजवट असताना पाणी रस्ते लाईट संदर्भात नागरिकांना किती त्रास भोगाव लागते आणि अधिकारी एसी केबिन मध्ये बसून मजा करताय यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर पोलीस विभाग महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहेत
भाजप पदाधिकारी नंदू जोशी विरोधात गुन्हा दाखल केल्यावर वाद झाल्याने डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखऱ बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. या प्रकरणाला जवळपास एक महिना उलटून गेला आहे. बागडे यांची सुट्टी संपत नाही. कोणालाही पदभार ही दिला जात नाही. दुसरीकडे बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेंद्र पाटील हे ३१ मे रोजी सेवा निवृत्त झाले. तेव्हापासून बाजारपेठला सिनिअर पीआय नाही. रामनगर आणि टिळकनगर याठिकामच्या पोलिस निरिक्षकांची बदली झाली. त्या पोलिस ठाण्यात दुसरे अधिकारी नियुक्त करण्यात आले. मात्र बाजारपेठ आणि मानपाडा पोलिस ठाण्यास वरिष्ठ पोलिस निरिक्षक का दिला जात नाही. हे दोन्ही पोलिस स्टेशन संवेधनशिल आहे. यावर राजू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, दुदैवी गोष्ट आहे. एक एकमहिना बाजारपेठ आणि मानपाड्याला सिनिअर पीआय नाही. मानपाडाची हद्द मोठी आहे. त्याचे विभाजन करण्याची मागणी केली आहे. परंतू यांच्या इच्छे प्रमाणे किंवा यांच्या बदल्यांचे टेंडर असते. बदल्याचे टेंडर कोणी भरले नसेल. म्हणून सिनिअर पीआय मिळत नाही. अशी टिका पोलिस प्रशासनावर केली आहे.
प्रशासकीय राजवट असल्यने अधिकारी एसीत बसून मजा घेत आहेत. नागरीकांचे हाल होत आहेत
मनसे आमदार राजू पाटील
कल्याण ग्रामीणमध्ये स्टार कॉलोनी परिसर आहे. या परिसरात महिन्यातून दोन दिवस पाणी येते. टँकरची पर्यायी व्यवस्ता केली जात नाही सर्वत्र कचरा पडला आहे. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या समस्याचा आढावा घेण्याकरिता आमदार पाटील त्याठिकाणी पोहचले. नागरीकांची त्यांनी भेट घेतली. या विषयी त्यांनी सांगितले की, प्रशासकीय राजवट आहे. अधिकाऱ्यांची मजा आहे. एसी कार्यालयत बसून अधिकारी मजा घेत आहेत नगरसेवक असते तर नागरीकांची कामे झाली असती. प्रशासकीय राजवटीत नागरीाकाचे हाल होत आहेत. यावेळी डोंबिवली मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत मनसे पदाधिकारी हर्षद पाटील हे देखील उपस्थित होते